Swatantra Veer Savarkar box office Collection Day 15 : रणदीप हुड्डाची मुख्य भूमिका असलेला ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपट सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होऊन दोन आठवडे झाले आहे. हा चित्रपट हिंदी व मराठी भाषेत २२ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. १५ दिवसांनंतर या चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन किती झालं आहे, या चित्रपटाने एकूण किती कमाई केली ते जाणून घेऊयात.

‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपटाने पहिल्या दिवशी २.९ कोटी रुपये कमामवले होते, त्यात १.४ हिंदी तर १.५ मराठीतून आले होते. दुसऱ्या दिवशी २.२५ कोटी, तिसऱ्या दिवशी २.७ कोटी, चौथ्या दिवशी २.१५ कोटी, पाचव्या दिवशी १.०५ कोटी, सहाव्या दिवशी १ कोटी, सातव्या दिवशी १.१५ कोटी कमावले.

What Mahesh Manjrekar Said About Veer Savarkar Film
Exclusive : ‘वीर सावरकर’ चित्रपट का सोडला? अखेर महेश मांजरेकरांनी सांगितलं कारण, म्हणाले, “रणदीप हुड्डाने…”
Swatantra Veer Savarkar Total box office Collection
‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपट प्रदर्शित होऊन २० दिवस पूर्ण, एकूण कलेक्शन किती? जाणून घ्या
swatantra veer savarkar budget
रणदीप हुड्डाने ज्यासाठी मालमत्ता विकली, त्या ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपटाचं मूळ बजेट किती? जाणून घ्या
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”

शरद पोंक्षेंची रणदीप हुड्डाच्या ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपटाबद्दल पोस्ट; म्हणाले, “खूप लोक…”

दुसऱ्या आठवड्यात म्हणजेच आठव्या दिवशी चित्रपटाने १.१ कोटी, नवव्या दिवशी १.५ कोटी, १० व्या दिवशी १.७५ कोटी, ११ व्या दिवशी ६० लाख, १२ व्या दिवशी ५० लाख, १३ व्या दिवशी ५० लाख आणि १४ व्या दिवशी चित्रपटाने ४५ लाख व १५ व्या दिवशी ४६ लाख रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटाचं दोन आठवड्यातील एकूण कलेक्शन १८.२१ कोटी रुपये झालं आहे.

‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपटाबद्दल प्रवीण तरडेंची प्रतिक्रिया, म्हणाले…

‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपटातून रणदीप हुड्डाने दिग्दर्शनात पदार्पण केलं आहे. यात त्याच्याशिवाय अंकिता लोखंडे व अमित सियाल यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटात वीर सावरकर यांचा जीवनप्रवास दाखविण्यात आला आहे.