रणदीप हुड्डाची मुख्य भूमिका असलेला ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ हा चित्रपट वीर सीवरकर यांच्या जीवनावर आधारित आहे. त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटना प्रेक्षकांसमोर मांडणारा हा चित्रपट शुक्रवारी (२२ मार्च रोजी) सिनेमागृहांमध्ये हिंदी व मराठी या दोन भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने धुलीवंदनच्या दिवशी किती कमाई केली, तसेच एकूण या चित्रपटाने किती बॉक्स ऑफिस कलेक्शन केलं, याची आकडेवारी समोर आली आहे.

रणदीप हुड्डाने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात अंकिता लोखंडे आणि अमित सियाल यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. ‘सॅकनिल्क’ने दिलेल्या आकडेवारीनुसार, या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी १.०५ कोटी रुपये कमावले होते, तर शनिवारी म्हणजेच दुसऱ्या दिवशी २.२५ कोटी व तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी चित्रपटाने दोन्ही दिवसांपेक्षा जास्त २.७ कोटी रुपयांची कमाई केली. प्रारंभिक आकडेवारीनुसार, धुलीवंदनच्या सुट्टीच्या दिवशी म्हणजे चौथ्या दिवशी चित्रपटाने २.२५ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

swatantra veer savarkar budget
रणदीप हुड्डाने ज्यासाठी मालमत्ता विकली, त्या ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपटाचं मूळ बजेट किती? जाणून घ्या
Swatantra Veer Savarkar Total box office Collection
‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपट प्रदर्शित होऊन २० दिवस पूर्ण, एकूण कलेक्शन किती? जाणून घ्या
Swatantra Veer Savarkar box office Collection Day 11
‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपटाच्या कमाईत मोठी घट, ११ व्या दिवशी कमावले ६० लाख, एकूण कलेक्शन जाणून घ्या
prasad oak post on swatantra veer savarkar movie
“खोट्या पोस्टकडे लक्ष देऊ नका…”, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाबद्दल प्रसाद ओकची प्रतिक्रिया; म्हणाला…

‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपटाच्या कमाईत तिसऱ्या दिवशी थोडी वाढ; रणदीप हुड्डाच्या सिनेमाचं एकूण कलेक्शन फक्त…

रविवारच्या तुलनेत सोमवारी चित्रपटाच्या कमाईत घट झाल्याचं या आकडेवारीवरून दिसून येत आहे. शुक्रवार वगळता वीकेंड व धुलीवंदनची सुट्टी अशा तीन दिवसांच्या सुट्टीत चित्रपटाने पहिल्या दिवसापेक्षा जास्त कमाई केली आहे. चार दिवसांत चित्रपटाचं एकूण कलेक्शन ८.७ कोटी रुपये झालं आहे. चित्रपटाच्या कमाईची ही आकडेवारी फक्त भारतातील आहे.

शरद पोंक्षेंची रणदीप हुड्डाच्या ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपटाबद्दल पोस्ट; म्हणाले, “खूप लोक…”

याच चित्रपटाबरोबर शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या ‘मडगांव एक्सप्रेस’ने चार दिवसांत ९.६५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी १.५ कोटी, दुसऱ्या दिवशी २.७५ कोटी, तिसऱ्या दिवशी २.८ कोटी व चौथ्या दिवशी २.६० कोटी रुपयांचा गल्ला जमवला. चित्रपटाचं एकूण कलेक्शन ९.६५ कोटी रुपये झालं आहे.