Swatantra Veer Savarkar box office Collection Day 3 : वीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपट शुक्रवारी (२२ मार्च रोजी) प्रेक्षकांच्या भेटीला आला. हा चित्रपट हिंदी व मराठी या दोन भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला ‘मडगाव एक्सप्रेस’ हा विनोदी चित्रपट चांगलीच टक्कर देत आहे. ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपटाने तीन दिवसांत किती कमाई केली, याची आकडेवारी समोर आली आहे.

रणदीप हुड्डाची मुख्य भूमिका व दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाची खूप दिवसांपासून चर्चा होती. अखेर चित्रपट प्रदर्शित झाला असून याला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतोय, हे त्याच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवरून कळतंय. पहिल्या दिवशी या चित्रपटाने १.०५ कोटी रुपयांची कमाई केली होती. पहिल्या दिवसापेक्षा दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईच्या आकड्यात वाढ झाली आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपटाची संथ सुरुवात, पहिल्या दिवसाची कमाई किती? जाणून घ्या

‘सॅकनिल्क’ने दिलेल्या वृत्तानुसार, दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपटाने २.२५ कोटी रुपयांची कमाई केली होती. तर, तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी चित्रपटाने दोन्ही दिवसांपेक्षा जास्त २.६० कोटी रुपयांची कमाई केली आहे. वीकेंड असूनही चित्रपटाच्या कमाईत फार जास्त वाढ झालेली नाही. आज सोमवारी धुलीवंदनची सुट्टी असल्याने या चित्रपटाला त्याचा किती फायदा होतो ते लवकरच कळेल.

१७ मिनिटांचा किसिंग सीन अन् ब्लॉकबस्टर सिनेमात काम, एकेकाळी ९०० रुपये महिना कमवायची आमिरची हिरोईन, अजूनही आहे अविवाहित

‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ या चित्रपटात वीर सावरकर यांचा जीवनप्रवास दाखविण्यात आला आहे. या चित्रपटात रणदीप हुड्डाव्यतिरिक्त अंकिता लोखंडे आणि अमित सियाल यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. दरम्यान, या चित्रपटासाठी रणदीप हुड्डाने खूप मेहनत घेतली आहे. अगदी वजन कमी करण्यापासून ते निर्मितीसाठी घर विकल्याचंही त्याने म्हटलं होतं.