‘कर्करोग’ हा एक दुर्धर आजार असला तरी त्यावर मात मिळवता येते हे आपण बऱ्याच लोकांकडून शिकलो आहोत. कित्येक बॉलिवूड सेलिब्रिटीजनी कॅन्सरवर यशस्वीरित्या मात केल्याची उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर आहेत. त्यापैकीच एक अभिनेत्री म्हणजे महिमा चौधरी. या कर्करोगावर मात करण्यात तिला कॉमेडीयन कपिल शर्माने प्रचंड मदत केल्याचा खुलासा नुकताच तिने केला आहे.

अभिनेत्री महिमा चौधरी आणि मनीष कोईराला या दोघींनी नुकतीच कपिल शर्माच्या कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमात दोघींनी प्रचंड धमाल केली आणि कपिलबरोबर मनमोकळ्या गप्पादेखील मारल्या. दरम्यान महिमाने तिचा कॅन्सरवर मात करण्याचा अनुभव शेअर केला इतकंच नाही तर यासाठी कपिल शर्माने तिला नेमकी कशी मदत केली याबद्दलही तिने सांगितलं.

A chance for historic success for Indian chess players sport news
भारतीय बुद्धिबळपटूंना ऐतिहासिक यशाची संधी!
82 year old CSK fan's tribute post for MS Dhoni wins internet
“मी धोनीसाठी आले आहे!”, ८२ वर्षीय आजीची सर्वत्र हवा! Viral Video एकदा बघाच
Candidates Chess Tournament R Pragyanand success in defeating Alireza Firooza sport news
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा: प्रज्ञानंदने फिरूझाला रोखले! गुकेश-विदित, हम्पी-वैशालीमध्ये पहिल्या फेरीत बरोबरी
अनोखी इफ्तार मेजवानी; हिंदू महिलांकडून मुस्लिम महिलांसाठी गोड भेट

आणखी वाचा : “त्यांना आरसा दाखवायला हवा…” बॉलिवूड स्टार्सच्या अव्वाच्या सव्वा मानधनावर समीक्षक तरण आदर्श स्पष्टच बोलले

महिमा म्हणाली “कपिल, माझ्या उत्तम तब्येतीमागचे कारण तू आहेस. काही काळापूर्वी मला कर्करोग झाला होता. त्यामुळे अशा परिस्थितीत मला फक्त आणि फक्त विनोदी गोष्टी पाहायच्या होत्या, जेणेकरून मी सर्व काही विसरून आनंदी राहू शकेन, मनमोकळेपणाने हसू शकेन. हा आनंद मला तुझा कार्यक्रम पाहून मिळायचा. हा कार्यक्रम बघताना मला कधी झोप लागायची आणि तोच बघता बघता मी आजारातून कधी उठले हे माझं मलाच कळलं नाही.”

महिमा चौधरीबरोबरच मनीषा कोईराला हिलाही कर्करोग झाला होता. मनीषा आणि महिमा दीर्घ उपचारानंतर कर्करोगमुक्त झाल्या आहेत. कपिल शर्माने शोमध्ये सांगितले की, मनीषा कोईराला याआधीही त्यांच्या शोमध्ये आली होती. यादरम्यान अभिनेता गंमतीने म्हणाला “तुम्ही ५ वर्षांपूर्वी शोमध्ये आला होता. त्यानंतर आता येत आहात. तुम्ही राजकीय घराण्याशी जोडलेल्या आहात म्हणून ५ वर्षांचा काळ लागला का?”. हे ऐकून मनीषासह प्रेक्षकही भरपूर हसले. या दोघींनी या भागादरम्यान खूप धमाल मस्ती आणि गप्पा मारल्या आणि प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.