The Kerala Story Box Office Collection day 2 : ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट ५ मे रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून बराच वाद सुरू होता, त्यामुळे चित्रपटाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या चित्रपटातील ३२ हजार महिलांच्या धर्मांतराचे दावे खोटे आहेत, असे म्हणत अनेक राजकीय पक्ष व धार्मिक संघटनांनी चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणीही केली होती.

हेही वाचा- ‘जवान’ चित्रपटाची रिलीज डेट पुढे का ढकलली? शाहरुखने स्वत: सांगितले कारण, म्हणाला…

little boy gave his mother birthday surprise in flight
VIDEO : विमानात चिमुकल्याने आईला दिलं सरप्राईज; अचानक झालेली ‘ही’ घोषणा ऐकून तुमचेही डोळे पाणावतील
Madhya Pradesh Chaddi Chor Gang caught Theft stealing womens lingerie from balcony cctv clip goes viral
पैसा, सोनं-चांदी नाही तर चक्क अंतर्वस्त्र चोरतोय हा चोरटा; घटनेचा VIDEO पाहून पोलिसही हैराण
Bengaluru Bull Attack Video
बैलाची धडक, ट्रकचा धक्का अन् बाईकस्वार थेट…अपघाताचा Video पाहून तुमच्याही काळजात होईल धस्स!
Mercedes Crashed Kachori Shop Video
भरधाव कार कचोरीच्या दुकानाला धडकली; ६ जण जखमी, Video मध्ये ‘त्या’ पतीची घालमेल पाहून नेटकरी भावुक

सुदीप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरला स्टोरी’ला पहिल्याच दिवशी प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. लोक या चित्रपटाचे कौतुक करत आहेत. ‘सॅकनिल्क’च्या रिपोर्टनुसार, ‘द केरला स्टोरी’ने रिलीजच्या पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर ७.५ कोटींचा व्यवसाय केला होता. चित्रपटाने दुसऱ्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशी चित्रपटाने १२.५० कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.

हेही वाचा- “आर्यनच्या क्लोदिंग ब्रँडचे जॅकेट एक ते दोन हजारपर्यंत बनवा”; चाहत्याच्या मागणीवर शाहरुखचे भन्नाट उत्तर, म्हणाला…

दरम्यान, या चित्रपटाला बराच विरोध होत होता. त्याच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या अनेक याचिकाही कोर्टांमध्ये दाखल करण्यात आल्या होत्या. केरळ उच्च न्यायालयाने शुक्रवारी एका याचिकेवर सुनावणी करताना ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यास नकार दिला. त्यानंतर केरळमधील ३२ हजारहून अधिक महिलांना ISIS मध्ये भरती करण्यात आल्याचा दावा करणारा चित्रपटाचा टीझर त्यांच्या सोशल मीडिया खात्यांवरून काढून टाकला जाईल, असे आश्वासन निर्मात्याने उच्च न्यायालयाला दिले.” सुदीप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे.