Premium

‘द व्हॅक्सिन वॉर’वर प्रतिक्रिया देण्यास अदा शर्माने दिला नकार; अभिनेत्रीने सांगितलं यामागील कारण

विवेक अग्निहोत्री यांनी ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाचं तोंडभरून कौतुक केलं होतं

adah-sharma
फोटो : इंडियन एक्सप्रेस

विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द व्हॅक्सिन वॉर’ हा चित्रपट सध्या चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. अनुपम खेर, नाना पाटेकर आणि पल्लवी जोशी यांसारख्या कलाकारांची भूमिका असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा मिश्र प्रतिसाद मिळत आहे. यादरम्यान, ‘द केरळ स्टोरी’ फेम अभिनेत्री अदा शर्मासुद्धा या चित्रपटामुळे चर्चेत आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नुकतंच जेव्हा अदाला या चित्रपटाबद्दल विचारण्यात आले तेव्हा तिने यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आणि असे करण्यामागील कारणही सांगितले. विवेक अग्निहोत्री यांनी ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाचं तोंडभरून कौतुक केलं होतं. त्यावेळी बऱ्याच लोकांनी ‘द केरला स्टोरी’ला प्रचंड विरोधही केला होता.

आणखी वाचा : Sky Force Promo: गांधी-शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त अक्षय कुमारची मोठी घोषणा; भारताच्या पहिल्या हवाई हल्ल्यामागील गोष्ट उलगडणार

आता ‘द व्हॅक्सिन वॉर’दरम्यानही काहीशी अशीच स्थिति समोर असताना अदाने यावर प्रतिक्रिय द्यायचं टाळलं आहे. मीडियाशी संवाद साधतान ती म्हणाली, “मला ‘द केरला स्टोरी’ नंतर समजले की चित्रपट पाहिल्याशिवाय कोणतीही टिप्पणी करू नये, कारण माझ्या चित्रपटाबाबतही असेच घडले होते, टीझर पाहिल्यानंतर लोकांनी खूप विरोध केला होता. त्यामुळे हा चित्रपट पाहिल्याशिवाय मी काहीच भाष्य करणार नाही.”

अद्याप अदाने चित्रपट पाहिला नसल्याने प्रतिक्रिया देण्यास नकार दिल्याचं स्पष्ट झालं आहे. काही महिन्यांपूर्वी आलेल्या ‘द केरला स्टोरी’ने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला होता. तर विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द व्हॅक्सिन वॉर’कडूनही लोकांना बऱ्याच अपेक्षा होत्या, परंतु चित्रपटाला म्हणावा तसा लोकांचा प्रतिसाद मिळाला नसल्याने ‘द व्हॅक्सिन वॉर’ची एवढी चर्चा आपल्याला पाहायला मिळत नाही.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The kerala story fame adah sharma explains why she is not giving reaction on the vaccine war film avn

First published on: 02-10-2023 at 15:23 IST
Next Story
Video: मामी-भाचीचा रॅम्पवर जलवा! ऐश्वर्या रायचा Classy Walk तर नव्या नवेलीचे पॅरिस फॅशन विकमध्ये पदार्पण