अभिनेत्री सारा अली खान ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. सारा अली खान ही सैफ अली खान आणि त्याची पहिली पत्नी अमृता सिंगची मुलगी आहे. अत्यंत कमी कालावधीत साराने स्वतःचा एक चाहता वर्ग तयार केला आहे. काही दिवसांपूर्वीच सारा अली खान क्रिकेटर शुबमन गिलला डेट करते आहे अशा बातम्या आल्या होत्या. अशातच आज साराने एक फोटो शेअर केला आहे. जो प्रचंड व्हायरल झाला आहे आणि सारासोबत स्विमिंग पूलमध्ये असलेला हा मिस्ट्री मॅन कोण? याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

काय आहे साराची पोस्ट?

सारा अली खानने तिच्या सुट्टीचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिची आई अमृता सिंगही दिसते आहे. तसंच सारा या फोटोंमध्ये सुट्टी एंजॉय करते आहे हे देखील दिसून येतं आहे. अशात स्विमिंग पूलमध्ये तिच्यासह एक व्यक्ती दिसते आहे. तो मिस्ट्री मॅन कोण? याच्या चर्चा आता सोशल मीडियावर सुरु झाल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सारासोबत असलेला हा मुलगा नेमका कोण आहे? या चर्चांना उधाण आलं आहे. साराचा हा फोटो व्हायरल झाला आहे. या मुलाने चष्मा लावला आहे. तो सारासोबत स्विमिंग पूलमध्ये उतरला आहे आणि दोघंही हसत गप्पा मारत आहेत असा हा फोटो आहे. ही व्यक्ती, हा मिस्ट्री मॅन कोण? याबाबत नेटकरी प्रश्न विचारत आहेत. सिम्मी नावाच्या अकाऊंटवरून साराला थेट प्रश्न विचारण्यात आला आहे की तू कुठल्या क्रिकेटरला डेट करते आहेस का? तर सारा तू शेअर केलेल्या फोटोंमध्ये पाचव्या फोटोत कोण आहे? असा प्रश्न प्रियंक नावाच्या नेटकऱ्याने विचारला आहे.