scorecardresearch

उर्फी जावेदने पुन्हा केलं ट्वीट, स्वत:च्या अंतर्वस्त्राचा उल्लेख करत म्हणाली, “…चित्राताई ग्रेट है”

चित्रा वाघ यांना सासू म्हटल्यानंतर उर्फीचं आणखी एक ट्वीट, पाहा काय म्हणाली उर्फी जावेद?

उर्फी जावेदने पुन्हा केलं ट्वीट, स्वत:च्या अंतर्वस्त्राचा उल्लेख करत म्हणाली, “…चित्राताई ग्रेट है”
उर्फी जावेद – चित्रा वाघ (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

मॉडेल उर्फी जावेद आणि भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्यातील शाब्दिक वाद थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही. उर्फी जावेद खूपच तोकडे कपडे घालते, त्यामुळे तिच्यावर कारवाई करण्याची मागणी वाघ यांनी मुंबई पोलिसांकडे केली होती. यासंदर्भात पत्रही त्यांनी मुंबई पोलिसांना दिलं होतं. तसेच उर्फीचं थोबाड फोडण्याचं वक्तव्यही त्यांनी केलं होतं. त्यांच्या वक्त्तव्यांना उर्फीही सडेतोड उत्तर देत आहे.

आणखी वाचा – “मेरी डीपी इतनी धांसू, चित्रा मेरी सासू”, उर्फीने ट्वीट करत चित्रा वाघ यांना पुन्हा डिवचलं

उर्फी ट्विटरवरून सातत्याने चित्रा वाघ यांना डिवचत आहे. ती फोटो पोस्ट करत त्याच्या कॅप्शनमध्ये चित्रा वाघ यांचा उल्लेख करताना दिसून येत आहे. सोमवारी तिने “मेरी डीपी इतनी धांसू, चित्रा मेरी सासू,” असं उर्फीने म्हटलं होतं. त्यानंतर तिने आणखी एक ट्वीट केलं आहे.

हेही वाचा – सॉफ्टपॉर्नवर आक्षेप नाही मग ऊर्फीवर का?

या ट्वीटमध्ये तिने चारोळी टाकली आहे. “उर्फी की अंडविअर मे छेद है, चित्रा ताई ग्रेट है,” असं ट्वीट तिने केलं आहे. त्यात स्वतःच्याच अंतर्वस्त्राचा उल्लेख करत तिने चित्रा वाघ महान असल्याचं म्हटलंय. त्यावर तिने तीन रेड हार्ट इमोजीही पोस्ट केले आहेत.

दरम्यान, मागच्या दोन आठवड्यांपासून चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांचा वाद सुरू आहे. या वादावर अमृता फडणवीसांपासून ते अनेक राजकारण्यांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-01-2023 at 07:54 IST

संबंधित बातम्या