बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला नेहमी चर्चेत असते. चित्रपटात फारशा महत्त्वाच्या भूमिका करीत नसली तरी उर्वशी तिच्या फॅशन सेन्ससाठी आणि बोल्ड लूकसाठी कायम चर्चेत असते. आता एका नव्या कारणामुळे उर्वशी चर्चेत आली आहे. आज (२५ फेब्रुवारी) उर्वशीचा वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त तिने कापलेल्या केकची सध्या चर्चा खूपच रंगली आहे.

उर्वशी आज आपला ३० वा वाढदिवस साजरा करीत आहे. या वाढदिवसानिमित्त मध्यरात्री १२ वाजता अभिनेत्रीने केक कापत आपला वाढदिवस साजरा केला. यावेळी तिच्याबरोबर प्रसिद्ध रॅप सिंगर हनी सिंगही उपस्थित होता. मात्र, या पार्टीत सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले ते उर्वशीच्या वाढदिवसाच्या केकने. उर्वशीने आपल्या वाढदिवसाच्या दिवशी २४ कॅरेट सोन्याने बनविलेला केक कापला. या केकची किंमत लाखो रुपयांमध्ये असल्याचे सांगण्यात येते. उर्वशीने केक कापतानाचे फोटो आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करीत तिने वाढदिवसाच्या पार्टीत उपस्थित राहिल्याबद्दल हनी सिंगचे आभार मानले आहेत.

वाढदिवसाच्या पार्टीत उर्वशीने लाल रंगाचा ड्रेस परिधान केला होता. तसेच तिने गळ्यात मोत्यांचा हार घातला होता. तिच्या हातात मोत्यांचे ब्रेसलेट होते. या लूकमध्ये उर्वशी खूप सुंदर दिसत होती. या वाढदिवसाचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. अनेक चाहत्यांनी या फोटोवर कमेंट्स करीत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा- Video: सेल्फी घेण्यावरून चाहत्यांवर भडकले नसीरुद्दीन शाह, म्हणाले, “तुम्ही डोकं…”

मात्र, उर्वशीने वाढदिवसाला इतका महागडा केक कापण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षीही तिने हिऱ्यांनी सजविलेला केक कापला होता. तसेच तिच्या वाढदिवसाच्या पार्टीत २४ कॅरेट सोन्याचे कप केकही होते. उर्वशीने वाढदिवसाच्या केकवर लाखो रुपये खर्च केल्यामुळे तिला ट्रोलही करण्यात आले होते.

हेही वाचा- सारा अली खानचा रेट्रो लूक पाहून नेटकऱ्यांना आठवली तिची आजी; म्हणाले, “ज्युनियर शर्मिला…”

एवढेच नाही, तर गेल्या वर्षी अहमदाबादमध्ये झालेल्या भारत आणि पाकिस्तान सामन्यादरम्यान उर्वशीचा २४ कॅरेट सोन्याचा आयफोन हरवला होता. उर्वशीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करीत ही माहिती दिली होती. तसेच हा फोन शोधून देणाऱ्या व्यक्तीस तिने बक्षीस देणार असल्याचेही जाहीर केले होते.