भारतीय मनोरंजसृष्टीतील दिग्गज अभिनेते विक्रम गोखले यांचे गेल्यावर्षी निधन झाले. गेले काही महीने त्यांच्यावर उपचार सुरू होते. या दुःखातून अजूनही सिनेसृष्टी सावरतीये. विक्रम गोखले यांनी नाटक, मालिका आणि चित्रपट अशा सर्वच माध्यमांमध्ये काम केले होते. त्यांनी रंगभूमीवर फार मोठा काळ गाजवला. त्याचप्रमाणे मराठी चित्रपटसृष्टीबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांनी त्यांची एक वेगळी ओळख निर्माण केली. कित्येक हिंदी चित्रपटात फार वेगवेगळ्या आणि स्मरणात राहणाऱ्या भूमिका त्यांनी निभावल्या.

विक्रम गोखले यांनी महानायक अमिताभ बच्चन यांच्याबरोबरही बऱ्याच चित्रपटात काम केलं. नुकताच त्यांचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये त्यांनी अमिताभ बच्चन यांच्यातील खरा अभिनेता आपल्या प्रेक्षकांनी वाया घालवला असं वक्तव्य केलं आहे. ‘ब्रुट’ या मीडिया पोर्टलने विक्रम गोखले यांनी त्यांची एक जुनी मुलाखत शेअर केली आहे. या मुलाखतीमध्ये विक्रम गोखले यांनी त्यांच्या या क्षेत्रातील अनुभवाबद्दल बरेच खुलासे केले आहेत.

man kidnapped and burnt to killed in gujarat over instagram status
पुणे: ‘म्हाळुंगे किंग’ पोस्ट जीवावर बेतली; अपहरण करून गुजरातमध्ये जाळून केली हत्या, वाचा सगळा घटनाक्रम
Imtiaz Ali on Amar Singh Chamkila caste
चित्रपटात चमकीला यांच्या जातीचा वारंवार उल्लेख, इम्तियाज अली म्हणाले, “त्यामुळेच त्यांनी आपला जीव गमावला, कारण…”
Bijay Anand on Maidaan vs Bade Miyan Chote Miyan clash
सोनाली खरे तिची लेक अन् पती, तिघांचे दोन सिनेमे एकापाठोपाठ प्रेक्षकांच्या भेटीला; बिजय त्यांच्या चित्रपटाबद्दल म्हणाले…
randeep surjewala made controversial remarks on hema malini
हेमा मालिनी यांच्याबाबत रणदीप सुरजेवालांचं वादग्रस्त वक्तव्य, कंगनाची तिखट शब्दांत प्रतिक्रिया, “द्वेष आणि तिरस्कार..”

एकप्रकारची भूमिका केल्यावर सतत तशाच भूमिका अभिनेत्याला मिळतात याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. इतकंच नव्हे तर अभिनेत्याला कुठे थांबायचं अन् नाही कधी म्हणायचं? याची समज असायला हवी असंही विक्रम गोखले म्हणाले. अमिताभ बच्चन यांनादेखील मिळणाऱ्या एकसूरी भूमिकांबद्दल आणि त्यांच्यात असलेल्या कलागुणांबद्दल विक्रम गोखले यांनी भाष्य केलं होतं. अमिताभ बच्चन यांच्यात प्रचंड प्रतिभा असूनही त्यांच्यातील अभिनेत्याचा आपण खून केला असं वक्तव्य विक्रम गोखले यांनी या मुलाखतीदरम्यान केलं होतं.

आणखी वाचा : “तो फक्त फरारी…”, दाऊद इब्राहिमच्या भेटीनंतर दिवंगत ऋषी कपूर यांनी केला होता महत्त्वाचा खुलासा

विक्रम गोखले म्हणाले, “परवाना चित्रपटापासूनच माझी आणि बच्चन साहेबांची चांगली मैत्री आहे. मी त्यांना वर्षभरातून एकदाच त्यांच्या वाढदिवशी त्यांना फोन करतो अन् म्हणूनच आमची मैत्री चांगली टिकून आहे. ‘खुदा गवाह’ चित्रपटानंतर मी एकदा अमिताभ बच्चन यांना विचारलं होतं की, तुम्ही ‘बॉम्बे टू गोवा’ आणि ‘आनंद’सारख्या चित्रपटापासून करकीर्द सुरू केली. गेली कित्येक वर्षं लोक तुमच्याकडून त्याच गोष्टी, तीच मारामारी, तीच डायलॉगबजी ऐकणं पसंत करत आहेत, तर हे पाहून तुम्हाला आतून रडू येत नाही का? दुःख होत नाही का? याचं उत्तर त्यांनी मला जेव्हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तेव्हा एक पत्र लिहून दिलं होतं. कारण माझ्यासाठी अमिताभ बच्चन हे एक अत्यंत उमदा आणि बुद्धिमान आणि ताकदवान अभिनेता आहेत. परंतु दुर्दैवाने या देशातील लोकांनी अमिताभ बच्चन यांच्यातील त्या अभिनेत्याचा खून केला आहे.”

विक्रम गोखले हे त्यांच्या अशाच बिनधास्त स्वभावासाठी आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जायचे. अभिनयासोबतच विक्रम गोखलेंनी लेखन आणि दिग्दर्शन क्षेत्रातही काम केले. त्यांनी २०१० मध्ये ‘आघात’ या चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले होते. या चित्रपटाचे समीक्षकांनी विशेष कौतुक केले होते. त्यानंतर २०१३ मध्ये त्यांना‘अनुमती’ या चित्रपटातील भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले होते. निधनापूर्वी काही दिवस विक्रम गोखले नवोदित कलावंतांना अभिनयाचे प्रशिक्षण देण्याचेही काम करत होते.