scorecardresearch

मसाबा गुप्ताच्या दुसऱ्या लग्नात वडील विवियन रिचर्ड्सची हजेरी; अभिनेत्रीने शेअर केलेला Family Photo पाहिलात का?

मसाबाच्या लग्नाला तिचे वडील आणि दिग्गज क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्स यांनीही हजेरी लावली.

vivian at masaba gupta wedding
या फोटोंमध्ये मसाबा, सत्यदीप, नीना गुप्ता, तिचे वडील विवियन रिचर्ड्स आणि इतर काही सदस्य दिसत आहेत. (फोटो – इन्स्टाग्राम)

फॅशन डिझायनर आणि अभिनेत्री मसाबा गुप्ता हिने बॉयफ्रेंड सत्यदीप मिश्राशी लग्नगाठ बांधली आहे. मसाबाने लग्नातील फोटो शेअर करत चाहत्यांना याबद्दल माहिती दिली. तिने लग्नातील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये काही परदेशी पाहुणे दिसत आहेत. मसाबाच्या लग्नाला तिचे वडील आणि दिग्गज क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्स यांनीही हजेरी लावली.

लेक मसाबाच्या दुसऱ्या लग्नानंतर नीना गुप्ता भावूक; फोटो शेअर करत म्हणाल्या…

मसाबा गुप्ताने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे. त्यात ती, सत्यदीप, नीना गुप्ता, तिचे वडील विवियन रिचर्ड्स आणि इतर काही सदस्य दिसत आहेत. “पहिल्यांदाच माझं संपूर्ण आयुष्य एकत्र आलं आहे. हे आम्ही आहोत. माझे सुंदर कुटुंब. इथून पुढे सर्व काही फक्त बोनस असेल”, असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे.

फॅशन डिझायनर मसाबा गुप्ताने दुसऱ्यांदा थाटला संसार

मसाबा गुप्ता ही क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्स आणि नीना गुप्ता यांची मुलगी आहे. मसाबाने अभिनेता सत्यदीप मिश्राशी लग्न केलं आहे. मसाबा व सत्यदीप या दोघांचंही हे दुसरं लग्न आहे. दोघेही एकमेकांना अनेक वर्षांपासून डेट करत होते. आज दोघांनी कुटुंबीयाच्या उपस्थितीत लग्न केलं आणि चाहत्यांना याबद्दल माहिती दिली. मसाबाच्या या फोटोंवर बॉलिवूडकर आणि तिचे चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-01-2023 at 14:18 IST