साठ-सत्तरच्या दशकातील ज्येष्ठ अभिनेत्री म्हणून सिमी गरेवाल यांना ओळखले जाते. ‘मेरा नाम जोकर’, ‘सिध्दार्थ’, ‘साथी’, ‘हाथ की सफाई’, ‘नमक हराम’ या अनेक चित्रपटात त्यांनी लक्षवेधी भूमिका साकारल्या होत्या. त्यांच्या दमदार अभिनयाने त्यांनी सर्वांचीच मन जिंकली. चित्रपटांबरोबरच सिमी गरेवाल त्यांच्या ‘Rendevouz with Simi Garewal’ या खास चॅट शोमुळेही चर्चेत होत्या.

आपल्या या मुलाखतीच्या कार्यक्रमात त्यांनी बऱ्याच दिग्गज लोकांना बोलावून त्यांच्याशी गप्पा मारल्या आहेत. त्यापैकीच बॉलिवूड अभिनेत्री रेखा यांच्याशी सिमी यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून गप्पा मारल्या अन् रेखा यांना त्यांच्या लव्ह लाईफबद्दल प्रश्न विचारले. याच चॅट शोमध्ये सिमी यांनी रेखा यांना थेट अमिताभ बच्चन यांच्यावर प्रेम आहे का? असा प्रश्न केला होता.

Sushil Kumar Modi passes away
सुशील कुमार मोदी यांचे निधन; जाणून घ्या त्यांचा राजकीय प्रवास
Biographies The film Srikanth tells the story of the struggle of a stubborn young man
श्रीकांत : एका जिद्दीची हृदयस्पर्शी कथा
Prakash Ambedkar on Ujjwal Nikam
करकरे, साळसकर यांच्या हत्येबाबत नवे प्रश्न; प्रकाश आंबडेकरांचे उज्ज्वल निकम यांना आव्हान, म्हणाले…
rajan vichare eknath shinde
“आनंद दिघेंनी राजन विचारेंना त्यांच्या भाषेत…”, एकनाथ शिंदेंचं वक्तव्य; म्हणाले, “धर्मवीरच्या दुसऱ्या भागात…”
Devendra Fadnavis Answer to Uddhav Thackeray
देवेंद्र फडणवीसांचा टोला, “उद्धव ठाकरेंनी मोदींवर टीका करणं म्हणजे सूर्याकडे थोबाड करुन थुंकण्याचा प्रकार”
Commenting on the problems of senior citizens Old furniture marathi movie Director Mahesh Manjrekar
रंजक नाटय़ाची फोडणी
Imtiaz Ali on Amar Singh Chamkila caste
चित्रपटात चमकीला यांच्या जातीचा वारंवार उल्लेख, इम्तियाज अली म्हणाले, “त्यामुळेच त्यांनी आपला जीव गमावला, कारण…”
Amar Singh Chamkila first wife recalls their final meeting
“त्यांनी अमरजोतशी लग्न केलं, पण…” अमरसिंग चमकीलांच्या खुनाबद्दल पहिल्या पत्नीचं विधान; म्हणाल्या, “मला त्यांचा खूप…”

आणखी वाचा : हॉलिवूडच्या प्रसिद्ध दिग्दर्शकाने घेतली इस्रायलच्या सैनिकांची भेट; क्वेन्टिन टेरेन्टिनोचं इस्रायल कनेक्शन जाणून घ्या

या प्रश्नाचं रेखा यांनीही तितक्याच सहजतेने आणि स्पष्टपणे उत्तर देत आपल्या प्रेमाची कबुलीही दिली होती. अमिताभ यांनी त्यांच्या आणि रेखामधील नात्याबद्दल उघडपणे कधीच भाष्य केलं नसलं तरी रेखा यांनी कधीच ते टाळलं नाही. त्यांना जेव्हा जेव्हा याबद्दल विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे त्यावर उत्तर दिलं. सिमी यांच्या कार्यक्रमातही रेखा यांनी अत्यंत स्पष्ट उत्तर दिलं. त्यावेळी सिमी असं रेखा यांना थेट कसं विचारू शकतात? अशी टीकाही त्यांच्यावर झाली होती.

याबद्दल बोलताना ‘इंडियन एक्सप्रेस’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सिमी यांनी स्पष्टीकरण दिलं होतं. सिमी म्हणाल्या, “जर मी जयललिता यांना विचारू शकते की त्यांचं एमजीआर यांच्यावर प्रेम होतं का? तर अमिताभ यांच्याबाबतीतला असाच प्रश्न रेखा यांना विचारणं माझ्यासाठी फारच सोप्पं होतं. मी त्या मुलाखतीमध्ये रेखा यांना नेमकं बोलतं कसं केलं याबद्दल मला खूप लोकांनी विचारलं, पण मीदेखील याचं उत्तर देऊ शकणार नाही. मी त्यावेळी फक्त माझ्या मित्र-मैत्रिणींशी गप्पा मारत होते.”