Rekha Jaya Bachchan Holi Video : सदाबहार अभिनेत्री रेखा यांचा आजही मोठा चाहतावर्ग आहे. सामान्य लोक तर त्यांचे चाहते आहेतच, पण इंडस्ट्रीतही रेखा यांच्यावर प्रेम करणारे, त्यांचा आदर करणारे खूप लोक आहेत. लोक अजूनही रेखाची एक झलक पाहण्यासाठी गर्दी करतात. रेखा यांनी करिअरमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्या व्यावसायिक आयुष्यात यशस्वी झाल्या असेल, पण त्यांनी वैयक्तिक आयुष्यात खूप चढ-उतार पाहिले आहेत.

रेखा आणि अमिताभ बच्चन यांचं एकमेकांवर प्रेम होतं, हे सर्वश्रुत आहे. रेखा अमिताभ यांचं नाव न घेता बरेचदा प्रेम व्यक्त करत असतात. नुकतीच होळी झाली. यानिमित्ताने त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्या पहिल्या प्रेमाबद्दल जया बच्चन यांच्याशी बोलताना दिसत आहेत.

व्हिडीओमध्ये नेमकं काय?

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली क्लिप होळीची आहे, ज्यामध्ये जया बच्चन आणि रेखा एकत्र दिसत आहेत. यामध्ये आधी जया आणि रेखा एकमेकांना रंग लावतात आणि नंतर एकमेकींना होळीच्या शुभेच्छा देतात. तेव्हा जया रेखा यांना म्हणतात, ‘तुझ्या चेहऱ्यावर गुलालाचा रंग किती किती छान दिसत आहे.’ यावर रेखा म्हणाल्या, ‘होळीचा रंग पाहून पहिलं प्रेम का आठवतं?’ यावर जया म्हणतात, ‘तुम्ही डॉक्टर साहेबांबद्दल बोलताय ना?’ रेखा म्हणतात, ‘त्यांच्याशी तर मी फक्त लग्न केलं आहे.’ जया विचारतात, ‘मग प्रेम?’ रेखा म्हणतात, “आमचं लग्न होण्याआधीच त्याचं लग्न इतरत्र झालं.” शेवटी जया म्हणतात, ‘या देशात नवराच प्रियकर असतो.’

जया बच्चन व रेखा यांचा होळीचा व्हिडीओ त्यांच्या चित्रपटातील आहे. दोघींही ‘सिलसिला’ चित्रपटात एकत्र काम केलं होतं. १९८१ मध्ये हा सिनेमा रिलीज झाला होता. या दोघींबरोबर अमिताभ बच्चन देखील या सिनेमात होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला होता, पण या सिनेमात जया, अमिताभ व रेखा एकत्र असल्याने खूप चर्चा झाली होती. ‘सिलसिला’ तब्बल ४३ वर्षांनंतर पुन्हा ७ फेब्रुवारी २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अमिताभ बच्चन व रेखा यांचा ‘सिलसिला’ हा शेवटचा चित्रपट होता. यानंतर त्यांनी कधीच एकत्र काम केलं नाही. अमिताभ बच्चन वगळता बच्चन कुटुंबातील सदस्य रेखा यांना खूप प्रेमाने, आदराने भेटतात. नुकत्याच एका कार्यक्रमात अभिषेक बच्चन व रेखा यांची भेट चर्चेचा विषय ठरली होती.