सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या अफेअरची चर्चा सध्या चांगलीच रंगली आहे. याबद्दल दोघांनी अधिकृतरित्या काहीही स्पष्टीकरण दिलं नसलं तरी सोशल मीडियावर या जोडप्याच्या लग्नाची चर्चा रंगली आहे. या दोघांचं लग्न कधी आणि कुठे होणार याची माहितीदेखील बाहेर आलेली आहे. सध्या मात्र एक या जोडप्यामध्ये झालेल्या भांडणाची चर्चा होताना दिसत आहे.

या दोघांमध्ये मध्यंतरी चांगलंच भांडण झाल्याचं मीडिया रीपोर्टनुसार सांगितलं जात आहे. याला कारणीभूत होता अभिनेता वरुण धवन. कियाराची परवानगी न घेता वरूण तिला कीस केल्याने सिद्धार्थ मल्होत्रा कियारावर चांगलाच भडकल्याचं म्हंटलं जात आहे. ही गोष्ट तशी जुनी असली तरी मीडिया रीपोर्टनुसार कियारा आणि सिद्धार्थमधील भांडणाचा उलगडा नुकताच झाला आहे.

IPL 2024 Punjab Kings vs Mumbai Indians Match Updates in Marathi
IPL 2024: डगआऊटमधून रिव्ह्यूसाठी सूचना; टीम डेव्हिडचं ‘ब्रेनफेड मोमेंट’, पाहा VIDEO
a young boy denied entry to bank of India branch for wearing shorts video goes viral
Nagpur Video: हा कोणता नियम! शॉर्ट पॅन्टमुळे बँकेत No Entry; नागपूरच्या तरुणाचा व्हिडीओ होतोय व्हायरल..
young Man takes selfie with leopard
Video : “डर के आगे जीत है..” शेतकरी तरुणाने घेतली चक्क चित्ताबरोबर सेल्फी, शेतातील व्हिडीओ होतोय व्हायरल
Bengaluru woman slammed for phone
स्कुटर चालवताना मोबाईलवर बोलण्यासाठी काकूंचा हटके जुगाड! व्हायरल व्हिडीओ एकदा बघाच

आणखी वाचा : पोलिस प्रशिक्षण केंद्रातून नागराज मंजुळेने काढला होता पळ; २५ वर्षांपूर्वीची आठवण सांगताना दिग्दर्शक भावूक

‘जुग जुग जियो’ या चित्रपटाच्या फोटोशूट दरम्यान वरूण धवनने दिग्दर्शकाची किंवा कियाराची परवानगी न घेता हळूच तिच्या गालावर कीस केलं. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फोटोशूट दरम्यान वरूण धवनची ही वर्तणूक सिद्धार्थला काही पटली नव्हती. यामुळेच सिद्धार्थ आणि कियारामध्ये भांडण झालं होतं. नंतर मात्र हे प्रकरण जास्त पुढे गेलं नसल्याचंही सांगितलं जात आहे.

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी या दोघांनी प्रथम ‘शेरशाह’ या चित्रपटात एकत्र काम केलं आणि त्यानंतरच हे दोघे प्रेमात पडल्याचं सांगितलं जात आहे. सिद्धार्थ नुकताच ‘थॅंक गॉड’ या चित्रपटात झळकला. शिवाय त्याच्या ‘मिशन मजनू’ लवकरच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. कियारा अडवाणी लवकरच कार्तिक आर्यनबरोबर ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटात झळकणार आहे.