बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत विरोधात सुरु असलेल्या मानहानी प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाकडू कंगनाला कोणताही दिलासा मिळालेला नाही. कंगनाने जावेद अख्तर यांच्याविरोधात दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे कंगना रणौतला कारवाईला सामोरं जावं लागणार आहे.
गीतकार जावेज अख्तर यांनी कंगना विरोधात उच्च न्यायालयामध्ये मानहानीचा खटला दाखल केला होता. हा खटला रद्द करण्याची मागणी करणारी याचिका कंगनाने केली होती. प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी दाखल केलेली अब्रुनुकसानीच्या फौजदारी तक्रारीची दखल घेऊन महानगरदंडाधिकाऱ्यांनी सुरू केलेली कारवाई रद्द करावी या मागणीसाठी अभिनेत्री कंगना राणावतने उच्च न्यायालयात धाव होती. तातडीचा दिलासा म्हणून महानगरदंडाधिकाऱ्यांनी सुरू केलेल्या कारवाईला स्थगिती देण्याची मागणीही कंगनाने केली होती. या याचिकेवर १ सप्टेंबरला सुनावणी पार पडली. त्यानंतर आज न्यायालयाने या प्रकरणावर निकाल घोषित केला आहे.
न्यायमूर्ती रेवती डेरे यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली. वकील रिजवान सिद्दीकी यांनी कंगना रणैतची बाजू मांडली. तर वकील जय के भारद्वाज यांनी जावेद अख्तर यांच्या बाजूने युक्तीवाद केला. दोन्ही वकीलांच्या युक्तीवादानंतर न्यायलयाने निकाल जैहीर केला. यात कंगनानला कोणाताही दिलासा मिळालेला नाही.
काय आहे प्रकरण?
सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर कंगनाने एका मुलाखतीत एका बॉलिवूड सुपरस्टारसोबतच्या वादावरून जावेद अख्तर यांच्याबाबत काही वादग्रस्त विधानं केली. यावरून गीतकार जावेद अख्तर यांनी नोव्हेंबर २०२० मध्ये कंगनाविरोधात मानहानीचा गुन्हा दाखल केला होता. यामुळे माझी विनाकारण मानहानी झाली असून प्रचंड मनस्ताप झाला आहे असा आरोप करत कंगनावर फौजदारी खटला चालवावा, अशी मागणी जावेद अख्तर यांनी अंधेरी दंडाधिकारी न्यायालयाकडे केली होती. न्यायालयाने १ मार्च रोजी कंगनाला वॉरंट जारी केला होता. मात्र हा खटला अजुनही प्रलंबित आहे.