छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री सुजाता कुमार यांचं रविवारी मेटास्टेटिक कॅन्सरने निधन झालं. त्यांच्या निधनाची माहिती मिळताच चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना आदरांजली अर्पण केली आहे. यावेळी बोनी कपूर यांनीदेखील सुजाता यांना आदरांजली अर्पण करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘इंग्लिश विंग्लिश’ या चित्रपटामध्ये सुजाता यांनी दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या बहिणीची भूमिका केली होती. त्यामुळे चित्रपटाच्या सेटवर सुजाता आणि श्रीदेवी यांची चांगलीच मैत्री झाली होती. सेटवर अनेक वेळा या दोघी एकत्र वेळ घालवत असे. याविषयी श्रीदेवी घरी आल्यावर बोनी कपूर यांना प्रत्येक गोष्ट सांगत असे. त्यामुळे सुजाता यांचं निधन झाल्यावर बोनी कपूर यांना धक्का बसला होता.

‘सुजाता आणि माझी ओळख पहिल्यांदा ‘इंग्लिश विंग्लिश’ चित्रपटाच्या सेटवर झाली होती. या पहिल्या भेटीनंतर आम्ही केवळ एक-दोन वेळाच भेटलोय. मात्र या अल्प परिचयामध्ये त्या एक चांगल्या व्यक्ती होत्या हे समजलं. सुजाता एक स्वाभिमानी महिला आहे असं, ‘श्री’ मला कायम सांगायची. त्यामुळे त्यांचं निधन झालं हे समजल्यावर मला प्रचंड धक्का बसला. त्या एक गुणी अभिनेत्री तर होत्याच पण त्याबरोबरच एक चांगल्या व्यक्तीही होत्या, असं बोनी कपूर यांनी सांगितलं.

दरम्यान, सुजाता यांनी ‘इंग्लिश विंग्लिश’ चित्रपटात उत्तम अभिनय केला होता. त्यामुळे पुढे त्यांच्या वाट्याला अनेक चांगले चित्रपट आले. त्यांनी रांझणा, गोरी तेरे प्यार में यासारखे चित्रपट केले होते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Boney kapoor shared memory when sridevi talk about sujata kumar
First published on: 21-08-2018 at 11:55 IST