अभिनेत्री विद्या बालनची मुख्य भूमिका असणाऱ्या ‘तुम्हारी सुलू’ या चित्रपटाला सध्या प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. ‘लेट नाईट रेडिओ शो’च्या आरजेच्या भूमिकेत झळकणाऱ्या सुलूची चित्रपट समीक्षकांनीही प्रशंसा केली आहे. या साऱ्याचा फायदा चित्रपटाच्या कमाईच्या आकड्यांमध्ये परावर्तित झाल्याचे पाहायला मिळते. देशभरात जवळपास ११५० स्क्रीन्सवर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने रविवारी ५.३९ कोटींची कमाई केली. ज्यामुळे ‘सुलू’च्या आतापर्यंतच्या कमाईचे आकडे १२.८७ कोटींवर पोहोचले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘पिंकव्हिला’ने प्रसद्ध केलेल्या वृत्तानुसार चित्रपटाला मिळालेला प्रतिसाद पाहता, हे यश अपेक्षित असल्याचे मत निर्माते भूषण कुमार यांनी मांडले. या चित्रपटाला मौखिक प्रसिद्धीचा जास्त फायदा झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सुरेश त्रिवेणी दिग्दर्शित ‘तुम्हारी सुलू’ या चित्रपटाच्या निमित्ताने विद्याने पुन्हा एकदा एका चौकटीबाहेरील पात्राला प्रभावीपणे प्रेक्षकांसमोर सादर केले आहे.

पाहा : Throwback Thursday : कपूर कुटुंबियांचे अविस्मरणीय क्षण…

एक सर्वसामान्य गृहिणी जेव्हा प्रसिद्ध रेडिओ वाहिनीच्या ‘लेट नाईट शो’ची आरजे होते, तेव्हा या साऱ्याचा तिच्या खासगी आयुष्यावरही कशा प्रकारे परिणाम होतो, याचे चित्रण या चित्रपटातून करण्यात आले आहे. अभिनेत्री नेहा धुपियासह आरजे मलिष्कासुद्धा या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. त्यामुळे ‘सुलू’ला या दोघींच्या लोकप्रियतेचाही फायदा झाल्याचे म्हटले जात आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Box office report of bollywood actress vidya balans movie tumhari sulu successful run
First published on: 20-11-2017 at 16:04 IST