अगदी कमी वेळातचं अमेय वाघ आणि निपुण धर्माधिकारी या दोघांनी आपल्या ‘कास्टिंग काऊच विथ अमेय अँड निपुण’ या वेब सिरीजद्वारे प्रेक्षकांची मने जिंकली. अगदी कमी वेळात प्रसिद्ध झालेल्या या वेब सिरीजमध्ये अनेक लोकप्रिय चेहरे झळकले आहेत. राधिका आपटे, प्रिया बापट, रिमा लागू, श्रिया पिळगावकर, सई ताम्हणकर, सैराट फेम रिंकू राजगुरु, आकाश ठोसर, नागराज मंजुळे यांनी या वेब सिरीजमध्ये आजवर हजेरी लावली होती. पण आपल्या विनोदांनी धम्माल उडवून देणा-या अमेय-निपुणच्या या वेब सिरीजची काही दिवसांपासून काहीच चर्चा नाहीए. कित्येक दिवस झाले याचा नवा एपिसोड आला नाही की याच्या संबंधित कुठची पोस्ट सोशल मिडीयावर दिसली नाही. पण लवकरचं याचा एक भन्नाट वेब एपिसोड तुम्हाला पाहायाल मिळणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून न दिसलेले अमेय आणि निपुण यांनी अचानक सोशल मिडीयावर एक फोटो पोस्ट करुन प्रेक्षकांच्या मनात मोठा प्रश्न निर्माण केला आहे. अमेय आणि निपुण कोणत्या भारदस्त व्यक्तीसमोर करतायेत विनवणी? असं कॅप्शन देऊन हा फोटो पोस्ट करण्यात आला आहे. कोण असेल ही व्यक्ती? तुम्ही काही अंदाज लावू शकता का?
मराठी सिनेअभिनेत्रींना घेऊन भारतीय डिजिटल पार्टीने ‘कास्टिंग काऊच विथ अमेय अँड निपुण’ ही वेब सिरीज सुरू केली आहे. या वेब सिरिजमध्ये सध्याचे ट्रेंडिंग विषय आणि त्यावेळी चर्चेत असलेल्या व्यक्तीला गेस्ट म्हणून बोलावले जाते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Casting couch with amey nipun new episode coming soon
First published on: 23-08-2016 at 12:01 IST