अनधिकृतरित्या मोबाईल कंपन्यांचे कॉल डिटेल्स रेकॉर्ड (सीडीआर) काढल्याप्रकरणी अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीनंतर आता टायगर श्रॉफची आई आयशा आणि कंगना रणौतही वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. आयशा श्रॉफने तिचा मित्र आणि अभिनेता साहिल खानच्या कॉलचे तपशील मागवले होती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

साहिल आणि आयशा यांच्यात आर्थिक देवाणघेवाणीवरुन वाद झाला होता. हा वाद पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचल्याने आयशाने साहिलचे कॉल रेकॉर्ड मागवल्याची सूत्रांची माहिती आहे. याप्रकरणी ठाणे पोलीस आयशा यांची चौकशी करणार असल्याचेही कळतेय.

दुसरीकडे बॉलिवूडची क्वीन कंगना रणौतसुद्धा पोलिसांच्या रडारवर आहे. तिने वकील रिझवान सिद्दीकीला हृतिक रोशनचा नंबर दिल्याचे म्हटले जात आहे. तर याप्रकरणी तिने स्पष्टीकरणसुद्धा दिले आहे. ‘एखाद्या नोटीशीचे उत्तर देताना सर्व तपशील वकीलांना द्यावे लागतात. अशावेळी हे तपशील कायद्याचे उल्लंघन करण्यास वापरले जातील असे म्हणता येणार नाही. आरोप करण्याआधी याप्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे,’ असे तिने स्पष्ट केले.

PHOTO : ‘विरुष्का’प्रमाणेच आणखी एक बहुचर्चित जोडी जाहिरातीत एकत्र झळकणार?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महिन्याभरापूर्वी ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने सीडीआर प्रकरणाचा खुलासा केल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती. बेकायदा लोकांचे सीडीआर काढल्याप्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत १२ जणांना अटक केली होती. यामध्ये भारतातील पहिल्या महिला गुप्तहेर रजनी पंडित यांचाही समावेश होता. त्यांना गेल्या आठवड्यात जामिन मिळाला.