आजच्या दिवशी १९९४ साली अंदाज अपना अपना हा चित्रपट प्रदर्शीत झाला होता. आज या चिपटाने २० वर्षे पूर्ण केली आहेत. ओ तेरी, मार्कवाला तेजा, दोन दोस्त एक कप ने चाय पिऐंगे, आप तो पुरुष नही महापुरुष है यासारखे अनेक अविस्मरणीय डायलॉग आजही प्रेक्षकांच्या चांगलेच लक्षात आहेत. इतकी वर्षे होऊनही प्रेक्षक न कंटाळता हा चित्रपट पाहावयास तयार होतात. कितीही वेळा हा चित्रपट पाहिला तरी त्यातली मजा कमी होत नाही.
‘अंदाज अपना अपना’मधील प्रत्येक पात्र अद्वितीय आहे. आमिरने आणि सलमानने साकारलेले अमर-प्रेम ह्या भूमिका तर लोकप्रिय आहेतचं. पण, तेजा, भल्ला, आनंद अकेला, रॉबर्ट, गोगो यांच्या भूमिकांनाही तितकेच नावाजले जाते. या सर्व भूमिका प्रेक्षकांना हसून हसून लोळायला भाग पाडतात. तुमचाही या चित्रपटातील एखादा आवडता डायलॉग असेलच आणि पात्रही. तर खालील प्रतिक्रिया बॉक्समध्ये त्याबद्दल नमूद करायला विसरू नका.
संग्रहित लेख, दिनांक 11th Apr 2014 रोजी प्रकाशित
‘अंदाज अपना अपना’ला २० वर्षे पूर्ण
आजच्या दिवशी १९९४ साली अंदाज अपना अपना हा चित्रपट प्रदर्शीत झाला होता. आज या चिपटाने २० वर्षे पूर्ण केली आहेत.
First published on: 11-04-2014 at 02:42 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Celebrating the 20th anniversary of aamir salmans madcap andaz apna apna