शी ऽऽऽ
कशीतरीच आहे ना ती लहान मुलगी…
ई ऽ ऽ…
ज्या लहान मुलीबद्दल या ‘कल्चर्ड’ महिला बोलत होत्या.
ती मुलगी गतिमंद होती.
घटना ‘मॉल’मधली. तिथल्या ‘किड झोन’मधली.
अलीकडच्या जीवनाचा अविभाज्य घटक.
नवी संस्कृती.
‘कल्चर्ड’ चमूनं निषेध केला.
‘आमची मुलं घाबरतात त्या मुलीला. तिला इथं नका खेळू देऊ…’
या भिशी खेळायला आलेल्या ‘कल्चर्ड’ चमूनं
सगळय़ांना मराठी/ हिंदी येत असूनही इंग्रजीत वाद घातला.
त्यांच्या दृष्टीनं उपस्थित प्रश्न (अंतर)राष्ट्रीय दर्जाचा असावा बहुतेक.
महिलांनी (मातांनीही) वाद घातल्यामुळे मॅनेजमेंटला नमावं लागलं.
परिणामी, त्या चिमुकलीला मुलांच्या घोळक्यातून बाजूला काढलं…
आपली मुलं ‘नॉर्मल’ असल्याचा अति गर्व असलेल्या ‘कल्चर्ड’ चमूचा विजय झाला.
काय आहे हो हे…?
माझ्यापुढे फार पूर्वीच्या दोन घटना चमकून गेल्या..

एक…
पुण्याला गेलो होतो मित्राकडे.
तो घरी नव्हता. त्याचा लहान भाऊ गतिमंद होता.
घरीच असायचा. आई त्याची खूप काळजी घ्यायची.
मित्र घरात नव्हता म्हणून मी त्याच्या आईला विचारलं, ‘कुठं गेलाय काही अंदाज…?’
(तेव्हा मोबाइल फोन्स नव्हते.)
तो त्या ‘xyz’कडे गेलाय.. (नाव मुद्दाम टाळलं आहे.)
कोण..? मला समजलं नाही.
तो नाही का रे तो थोडासा बावळटासारखा दिसतो..
बघा…
दुसऱ्याचा मुलगा, मूल त्याच्याबद्दल अजिबात काडीमात्र कणव नाही.
तोंडातून चुकून निघून गेलं असेल त्यांच्या असा समज मी करून घेतला. गोष्ट बाजूला टाकली.

Solapur, Aba Kamble murder case,
सोलापूर : खून का बदला खून; आबा कांबळे खून खटल्यात वृद्ध पैलवानासह सातजणांना जन्मठेप
bachchu kadu
“तुला माझ्याशिवाय कोणी दिसत नाही? रात्री स्वप्नात येईन अन्…”, बच्चू कडूंचा रवी राणांना टोला
two accused arrested in Salman Khan house firing case (1)
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोघांना गुजरातमधून अटक, पोलिसांनी व्हिडीओ केला शेअर
Byju employees lost their jobs
नोटीस पीरियड नाही, पगारही नाही; फक्त एक फोन कॉल अन् बायजूच्या कर्मचाऱ्यांनी नोकरी गमावली

दोन..
माझ्या एका मित्राची बहीण.
तिला बाळ झालं.
ते अतिशय सुंदर होतं
आणि तिला तर ते अधिकच सुंदर वाटत असावं.
साहजिकच आहे.
तक्रार असण्याचं काही कारण नाही.
पण माझ्या या मित्राची बहिण लहान बाळाला भीती वाटेल म्हणून फक्त गोऱ्या व्यक्तींनाच त्या बाळाजवळ येऊ द्यायची.
काळी (सावळीसुद्धा!) मुलं, माणसं तिनं तिच्या
मुलीला दिसूच दिली नाहीत.
ती घाबरेल हीच सतत भीती तिच्या मनात.
असतात काही काही माणसं अशी…

आता इथं त्या कल्चर्ड चमूच्या वागण्यानं
त्या चिमुकलीच्या आई-वडिलांना ‘चर्र’ झालं असणार.
पण त्या मुलीच्या आईनं खिंड लढवली.
मॅनेजमेंटला या गोष्टीबद्दल जाब विचारला.
कल्चर्ड चमूनंही यात इंग्रजीमध्ये उडी घेतली.
अखेर त्या आईच्या ‘हिरकणी’च्या जिद्दीपुढे मॅनेजमेंटला नमावं लागलं.
त्यांनी माफी मागितली.
आता मुद्दा मॉलवाल्यांचा नाही मानवी मूल्याचा आहे.
ज्यांनी हे काचेचं चकचकीत जंगल उभं केलं
त्यांना काळीज असल्याचं कळलं.
पण आपल्या लहानग्यांना ‘किड झोन’मध्ये घेऊन आलेल्या मम्मीज (मम्मी मंडळी)चं काळीज मात्र द्रवलं नाही. त्यांनी निषेध केला.
परत येणार नाही तुमच्या मॉलमध्ये.
आणि तावातावात अनेक सँडल्स
खटखटत निघून गेल्या.
जाताना मुलांसाठी ‘पाव’सदृश काहीतरी ‘सॉलिड’ पॅक करून घेतलं.
त्यांच्या पिढीला (नव्या) दणकट खुराक हवाच ना…
एकवार दगडावर उगवेल, काँक्रीटवरही उगवेल,
पण काहींच्या (सरसकट घ्यायची गरज नाही… नाहीतर
मुख्य मुद्दा राहतो बाजूला आणि भलतेच self respect चे
वाद सुरू होतात) कल्चर्ड मनाला कधी पालवी
फुटेल ते तेच जाणो…

ता. क.
माणुसकीचे ‘इनग्रेडियंट्स’ असलेला एखादा ‘बर्गर’ मिळतोय का ते पाहायला हवं..

-मिलिंद शिंदे