झी वाहिनीवरील अतिशय लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे ‘चला हवा येऊ द्या’. या कार्यक्रमाने महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या मनावर राज्य केले आहे. आता या कार्यक्रमातील कलाकार मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे.
चला हवा येऊ द्यामध्ये आपल्या अभिनयाने लाखो लोकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री स्नेहल शिदम लवकरच चित्रपटात झळकणार आहे. तिच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘स्वीटी सातारकर’ आहे. नुकताच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे.
स्नेहल ही ‘चला हवा येऊ द्या ‘च्या ‘होऊ द्या व्हायरल’ या पर्वाची विजेती होती. ती किर्ती कॉलेजमध्ये तिचे शिक्षण घेत आहे. अभ्यासासोबतच ती अनेक एकांकिकांमध्ये देखील दिसते. या एकांकिकांसाठी तिला अनेक पारितोषिके देखील मिळाली आहेत. ‘ओवी’ या व्यावसायिक नाटकामधून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.
View this post on Instagram
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
‘स्वीटी सातारकर’ या चित्रपटाचे दिग्दर्शन शब्बीर नाईक यांनी केले आहे. तसेच या चित्रपटाची निर्माती मुनाफ नाईक आणि संतोष साबळेने केली आहे. या चित्रपटात अमृता देशमुख, संग्राम समेळ, विजय निकम, गौरी जाधव, वंदना वाकनीस, पुष्कर पुष्कर लोणारकर, विनम्र भाबल, प्रशांत विचारे हे कलाकार दिसणार आहेत. येत्या २८ फेब्रुवारीला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.