संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवणारा झी मराठी वाहिनीवरील सर्वांचा आवडता आणि तितकाच लोकप्रिय शो म्हणजे ‘चला हवा येऊ द्या.’ या शोमधील कलाकार कुशल बद्रिके, भाऊ कदम, श्रेया बुगडे यांनी तर प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. आता ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमात उत्तर कोरियाचा हुकूमशहा ‘किम जोंग उन’ दिसणार आहे. त्यामुळे प्रेक्षक या भागाची आतुरतेने वाट पाहात आहात.

जगात मिळत्या जुळत्या चेहऱ्याची ७ माणसं असतात असं म्हंटल जातं. उत्तर कोरियाचा हुकूमशहा ‘किम जोंग उन’ सारखे दिसणारे देखील बरेच चेहरे असतील. त्याच्या सारखा हुबेहूब दिसणारा नगर मधला अभिषेक बारहाते हा त्यापैकीच एक. नुकतंच अभिषेक चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाच्या मंचावर अवतरला आणि या बावळ्या किम जोंग उनला पाहून उपस्थित कलाकार खळखळून हसले. अभिषेकची हेअरस्टाईल आणि शरीरयष्टी हि हुबेहूब किम जोंग उन सारखी आहे त्यामुळे त्याला सोनईचा किम जोंग उन म्हणतात.

महाराष्ट्राचा हा किम जोंग उन अगदी अल्पावधीतच व्हायरल झाला आहे. नगरी भाषेत विनोद करणारा हा किम जोंग आणि मराठमोळा डोनाल्ड ट्रम्प तात्या यांची मिश्किल केमिस्ट्री चला हवा येऊ द्याच्या आगामी भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. हा देशी किम जोंग प्रेक्षकांना हसून हसून लोटपोट करणार यात शंकाच नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाराष्ट्राचा किम जोंग उन अशी उपमा आपल्याला मिळालेल्या अभिषेकने सांगितलं, “मी किम जोंगच्या खूप विरुद्ध आहे. मी खूप हसून खेळून राहणार आहे, स्वतःमध्ये रमणारा आहे. माझा चेहरा त्यांच्याशी मिळता जुळता आहे त्यामुळे माझी एक वेगळीच ओळख निर्माण झाली आहे.” यापुढे ‘माझी कुठेच चालत नाही. मी स्वतःच्या घरी देखील हुकूमशाह नाही आहे’ असे अभिषेकने हसत हसत सांगितले.