सध्याच्या अतिशय लोकप्रिय कार्यक्रमांच्या यादीमधील एक नाव म्हणजे ‘चला हवा येऊ द्या.’ या कार्यक्रमातील कलाकार हे त्यांच्या विनोदाने प्रेक्षकांचे खळखळून हसायला भाग पाडतात. पण आता या कार्यक्रमात काम करणाऱ्या एका कलाकाराला हिंदी मालिकांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रीमुळे त्रास होत आहे. त्याने पोस्ट करत याबाबत माहिती दिली नाही.

तुषार हा संगीत दिग्दर्शक असून ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर तो संगीताची धुरा सांभाळताना दिसतो आहे. यासोबतच कधी कधी तो आपल्या विनोदी अभिनयाची झलक प्रेक्षकांना दाखवतो. मात्र गेल्या काही दिवसांपासून तुषारला एका हिंदी अभिनेत्रीमुळे त्रास सहन करावा लागत आहे. त्यामागचे कारण त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सांगितले आहे.
आणखी वाचा : ‘१४ वर्षे दोन पाहुणे घराबाहेरच ठेवले आहेत’, अमोल कोल्हेंची पत्नीसाठी खास पोस्ट

तुषारने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या संदर्भात पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने, ‘नमस्कार, मी तुषार देवल गेले काही दिवस मला खूप फोन येत आहेत.. त्यामुळे मी प्रचंड त्रस्त झालो आहे. या सगळ्याचं कारण आहे एका हिंदी मालिकेतील अभिनेत्री (ख्याती जोशी) उर्फ गुलरी जोशी. तिने तिच्या एका यूट्यूब इंटरव्ह्यूमध्ये तिचं CINTAAचं कार्ड दाखवलं. ज्यामध्ये माझा मोबाईल नंबर दाखवला गेला’ असे म्हटले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे तो म्हणाला, ‘मी गुलकी जोशी असल्याचे समजून मला दिवसाला जवळपास १०० च्या वर कॉल येत आहेत. ही सर्व माहिती त्या अभिनेत्रीपर्यंत माझ्या एका मित्राच्या माध्यमातून पोहोचवली. त्यावर तिने त्या यूट्यूब चॅनेल मधील व्हिडीओतील माझा नंबर ब्लर केला. पण तोपर्यंत हा व्हिडीओ ६ हजार लोकांनी पाहिला होता. त्यामुळे मला अजूनही कॉल येत आहेत. बरं या सगळ्या प्रकरणानंतर मॅडमने मला सॉरी म्हणालायला तरी कॉल करायला पाहिजे होता. तो अद्याप आलेला नाही… तरी या प्रकरणातून मार्ग कसा काढचा येईल गुलकी जोशी?’