‘चला हवा येऊ द्या’ पत्र फेम लेखक अरविंद जगताप हे आपल्या सोशल नेटवर्किंगवरील पोस्टमुळे अनेकदा चर्चेत असतात. मग त्या रजकीय टोलेबाजी करणाऱ्या पोस्ट असो किंवा एखाद्या आगळ्यावेगळ्या गोष्टीबद्दल त्यांनी शेअर केलेली माहिती असो, जगताप हे सोशल नेटवर्किंगवर आपल्या लिखाणाची झलक दाखवत असतात. कायम आपल्या लेखणीमधून वाचकांना आनंद देणाऱ्या जगताप यांनी बुधवारी आपल्या चाहत्यांसाठी एक कोडं फेसबुकवर पोस्ट केलं आहे.

अनेकदा समाजामधील घडामोडींवर अगदी मार्मिक पद्धतीने भाष्य करणाऱ्या अरविंद जगताप यांनी फेसबुकवर एक चारोळी पोस्ट केली आहे. या चारोळीमधून ते कोणाबद्दल बोलत आहेत याचा अंदाज लावताना त्यांचे चाहते दिसत आहेत.

काय आहे जगताप यांनी घातलेलं कोडं?

जगताप यांनी पोस्ट केलेलं कोडं पुढीलप्रमाणे…

हजार खांबाचे देऊळ पण भिंती नाहीत,
लक्ष लक्ष लाल दिवे पण झुंबरं नाहीत,
लक्ष लक्ष हिरव्या पताका पण झेंडा नाही
असा कोण?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तुम्हाला ठाऊक आहे का कोड्याचं उत्तर? कमेंट करुन नक्की कळवा या ओळींमधून तुमच्या मनात कोणं डोकावून गेलं?