‘शर्मिली’ हा १९७१ साली प्रदर्शित झालेला हिट चित्रपट होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन समिर गांगुली यांनी केले होते. एस डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेल्या या चित्रपटाची गाणी भारतीय प्रेक्षकांना बरीच पसंत पडली होती. किशोर कुमार, लता मंगेशकर, आशा भोसले या ताकदीच्या गायकांनी ही गाणी गायली होती. १९७१ सालातील ‘बिनाका गीतमाला’च्या १०० गाण्यांमध्ये ‘शर्मिली’ चित्रपटातील गाण्यांचा तेव्हा समावेश करण्यात आला होता. ‘खिलते है ये गुल यहा’, ‘ओह मेरी शर्मिली’ ही गाणी आजही अनेकांच्या प्ले लिस्टचा भाग आहेत.

वाचा : अमेय वाघ- साजिरी देशपांडेच्या लग्नाचे फोटो

या चित्रपटामध्ये शशी कपूर, नरेंद्र नाथ, नाझिर हुसैन, इफ्तेखार, एस एन बॅनर्जी, अनिता गुहा आणि अतिफ सेन यांच्या भूमिका होत्या. ‘शर्मिली’मध्ये आणखी एक अभिनेत्री होती जिने दुहेरी भूमिका साकारलेली. या अभिनेत्रीचे नाव काय ते तुम्हाला सांगायचे.

प्रश्न- ‘शर्मिली’ चित्रपटात कोणत्या अभिनेत्रीने दुहेरी भूमिका साकारली होती?
पर्याय
१. हेमा मालिनी
२. राखी
३. शर्मिला टागोर

वाचा : ‘कौन बनेगा करोडपती’ नवव्या सिझनसाठी रेकॉर्डब्रेक रेजिस्ट्रेशन

भारतीय बॉक्स ऑफिसवर ‘शर्मिली’ चित्रपट हिट ठरला होता. या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाऱ्या शशी कपूर आणि दुहेरी भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीची समीक्षकांनी तर प्रशंसा केलीच होती पण व्यावसायिकदृष्ट्याही ते यशस्वी ठरले होते. ‘बॉक्स ऑफीस इंडिया’ या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार चित्रपटाने जवळपास २,६०,००,००० रुपये इतकी कमाई केली होती.

गेल्या आठवड्यातील प्रश्नाचे उत्तर
बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी अक्षय कुमार कोणते काम करत होता?
उत्तर- वेटर