…म्हणून ऐश्वर्या, सलमान एकमेकांसमोर येणार नाहीत

त्यांच्यात मैत्रीचं नातंही अस्तित्वात नाही

salman aishwarya
सलमान खान, ऐश्वर्या राय

सलमान खान आणि ऐश्वर्या राय ही दोन नावं घेतली की त्यापुढे काहीच बोलण्याची गरज भासत नाही. कारण बऱ्याच विषयांना आपसुकच वाचा फुटते. बऱ्याच वर्षांपूर्वी रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या सलमान आणि ऐश्वर्याचा ब्रेकअप झाला आणि त्यानंतर या दोघांच्याही वाटा वेगळ्या झाल्या होत्या. मुख्य म्हणजे त्यांच्यात मैत्रीचं नातंही अस्तित्वात नसल्याचं म्हटलं जात आहे. नात्यात आलेल्या दुराव्यानंतर या दोघांनीही थेट एकमेकांसमोर येणं प्रकर्षाने टाळलं. पण, काही दिवसांपासून आगामी चित्रपटांच्या निमित्ताने ऐश्वर्या आणि सलमान पुन्हा एकदा आमनेसामने येणार असल्याच्या चर्चा होत्या. आता मात्र ती शक्यताही टळली आहे.

सलमानचा ‘रेस ३’ आणि ऐश्वर्याचा ‘फन्ने खान’ हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होणार असल्याच्या चर्चा होत्या पण, सलमानने या चर्चांना दुजोरा दिला नसल्याचं स्पष्ट झालं आहे. इतकेच नव्हे तर ‘फन्ने खान’ हा चित्रपट आता १३ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती ‘क्रिअर्ज एंटरटेन्मेंट’ या निर्मिती संस्थेतर्फे देण्यात आली आहे.

वाचा : ‘ख्वाबों की शहजादी’ निघून जाते तेव्हा…

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ऐश्वर्याच्या चित्रपटाशी ‘रेस ३’ची टक्कर व्हावी असे सलमानला मुळीच वाटत नाही. त्यामुळेच आता हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर एकमेकांवर धडकणार नाहीत, याविषयी काळजी घेण्यात आल्याचं दिसत आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाती ऐश्वर्या रायच्या लूकवरुन पडदा उचलण्यात आला होता. ‘फन्ने खान’मध्ये ऐश्वर्या व्यतिरिक्त अभिनेता अनिल कपूर आणि राजकुमार रावसुद्धा महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत. ऑस्करसाठी निवड झालेल्या ‘एव्हरीबडीज फेमस’ (२०००) या चित्रपटाच्या कथेवर ‘फन्ने खान’ची कथा आधारित आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Clash between bollywood actor salman and actress aishwarya averted fanne khan to release on july 1 race

ताज्या बातम्या