बहुचर्चित रिअॅलिटी शो ‘बिग बॉस मराठी’मध्ये शनिवारी वीकेंडचा डाव रंगला. यामध्ये महेश मांजरेकर यांनी सदस्यांना मागील आठवड्यामध्ये दिलेल्या कार्याला पूर्ण करण्यास सांगितले. ज्यामध्ये पुष्कर आणि रेशमच्या टीमने नाटक सादर केले. पुष्करच्या टीमचे नाटक महेश मांजरेकर यांना आवडले. महेश मांजरेकर यांनी आऊ आणि भूषणला उत्कृष्ट अभिनेता आणि अभिनेत्री तर नंदकिशोर आणि पुष्करला उत्तेजनार्थ बक्षीस दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मागील आठवड्यात नंदकिशोर चौघुले यांनी बिग बॉस मराठीच्या घरामध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री घेतली. त्यानंतर त्यांनी वेगळाच पवित्रा घेतल्याचे दिसले आणि त्यांनी ते भूषणसमोर बोलूनदेखील दाखवले. भूषण, नंदकिशोर आणि त्यागराज यांनी मिळून आऊची कुशन टास्क मध्ये बरीच मस्करी केली तसेच नंदकिशोरबरोबर पुष्कर, मेघा, सई आणि शर्मिष्ठा यांचा वाद बराच रंगला. त्यावरून महेश मांजरेकर यांनी नंदकिशोर बरोबरच इतर पुरुष मंडळीची शाळा घेतली. त्यांना भूषण, आस्ताद, त्यागराज आणि नंदकिशोर यांचे वागणे अजिबात पटले नसल्याचे खडसावून सांगितले. काल सुशांत शेलार यांनी सदस्यांची भेट घेतली आणि तो सुखरूप असल्याचेदेखील सांगितले. महेश मांजरेकर यांनी आता सुशांत बिग बॉस मराठीच्या घरामध्ये पुन्हा येऊ शकणार नाही असे सदस्य तसेच प्रेक्षकांना सांगितले.

वाचा : पु. ल. देशपांडे यांची जीवनगाथा लवकरच मोठ्या पडद्यावर

आज वीकेंडचा डावमध्ये पुन्हा घरातील सदस्यांना मुकूट देण्यात येणार आहेत. त्यामुळे कोणाला कोणत्या नावाचा मुकूट मिळतो ते बघणे रंजक असणार आहे. या मुकुटांवर सिनेमांची म्हणजेच गुलाम, ट्यूबलाईट अशी नावे असणार आहेत. आता बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्य हे मुकुट कोणाला देणार आजच्या भागामध्ये कळेलच. तसेच यावरून आऊ आणि स्मितामध्ये बरीच वादावादी होणार आहे. त्यामुळे आजच्या भागामध्ये कोण डेंजर झोन मध्ये जाणार ? कोण घराबाहेर जाणार ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Colors marathi bigg boss marathi todays updates weekend cha daav task
First published on: 10-06-2018 at 16:30 IST