साजिद नाडियादवाला आणि अक्षय कुमार हे समीकरण तसे जुनेच. गेली दहा वर्ष निर्माता-अभिनेता म्हणून एकत्र आलेली ही जोडगोळी पुन्हा एकदा ‘बच्चन पांडे’ या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आली आहे. अतरंगी नावाच्या या चित्रपटात तद्दन व्यावसायिक मसाला ठासून भरलेला आहेच, मात्र विनोद आणि विक्षिप्त व्यक्तिरेखांवर भर देत विनोदी धाटणी नव्याने प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न केल्याचा दावा अक्षयने केला आहे. ‘बच्चन पांडे’ हा ‘जिगरथान्दा’ या तमिळ चित्रपटाचा रिमेक आहे किंबहुना ‘जिगरथान्दा’ हाही दक्षिण कोरियातील ‘अडर्टी कार्निवल’ या चित्रपटाचा रिमेक होता. पण म्हणून फक्त बॉलीवूडपटांवर रिमेकचाच शिक्का मारणे योग्य नाही, असे मत चित्रपटाचा नायक अक्षय कुमार याने व्यक्त केले आहे.

गायत्री हसबनीस

मायकेल गिफ्किन्स पुरस्कारांच्या नामांकन यादीत श्रिया भागवत
Mumbai Police Arrest Accused Pretending to be from Akshay Kumar s Production Company Trying to Cheat
अभिनेता अक्षय कुमारच्या नावाने तरूणीला फसवण्याचा प्रयत्न, आगामी चित्रपटात भूमिका देण्याचे आमिष
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’

विनोदी अभिनेत्याला आजच्या काळात विनोदाकरता विशेष वेगळा पुरस्कार कुठेही दिला जात नाही. प्रणयी वा प्रेमी नायक साकारणाऱ्या अभिनेत्यांना अनेक पुरस्कार असतात, मात्र केवळ विनोदी भूमिका करणाऱ्या कलाकाराला कुठलाच पुरस्कार दिला जात नाही. विनोदी अभिनेते यामुळे कायम दुर्लक्षित राहिले आहेत, अशी खंत सध्याचा बॉलीवूडचा आघाडीचा नायक अक्षय कुमारने व्यक्त केली आहे. अक्षय कुमार, क्रिती सनन, जॅकलिन फर्नाडिस आणि अर्शद वारसी यांचा ‘बच्चन पांडे’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. बच्चन पांडे हा नक्की आहे तरी कोण. त्याच्या एकूणच बाह्यरूपावरून पृथ्वीवर असा इसम सापडणे जवळपास दुर्मीळच. अशा विचित्र व्यक्तिरेखेची कथा सांगणारा हा चित्रपट विनोदी शैलीतील असून प्रेक्षकांची करमणूक करणे हाच त्याचा उद्देश असल्याचे अक्षयने स्पष्ट केले.

गेले काही महिने सातत्याने गंभीर भूमिकांमधून प्रेक्षकांसमोर येणारा अक्षय कुमार हा विनोदी अभिनयासाठीही तेवढाच प्रसिद्ध आहे. ‘हाऊसफुल्ल’ वा तत्सम चित्रपटांच्या निमित्ताने तो विनोदी भूमिकांमधूनही लोकांसमोर आला आहे. मात्र विनोदी चित्रपटांची फारशी दखल घेतली जात नसल्याने त्यांचे प्रमाण कमी आहे, असे तो म्हणतो. ‘‘आजही कुठल्या पुरस्कार सोहळय़ाला मी गेलो की विनोदी भूमिकेसाठी कोणाला नामांकित पुरस्कार मिळाला आहे हे फार कुठे पहायला मिळत नाही. एक काळ असा होता जेव्हा ‘हेराफेरी’, ‘गोलमाल’ अशा चित्रपटांमुळे ते शक्य झाले होते. विनोदी चित्रपटांनीही तोडीस तोड यश मिळवले होते, मात्र अजूनही त्यांना फारसा प्रतिसाद मिळत नाही जो मिळायला हवा. त्यासाठी मी प्रयत्न करतो आहे’’, अशी भावना त्याने व्यक्त केली.

 ‘बच्चन पांडे’ चित्रपटातील त्याच्या विचित्र लूकपासून सगळय़ा गोष्टींची सध्या चर्चा आहे. त्याबद्दल बोलताना पाश्चात्त्य चित्रपटांमध्ये अशा वेगळय़ा, विचित्र प्रत्यक्षात सहजी न दिसणाऱ्या व्यक्तिरेखा असतात तेव्हा प्रेक्षकांना त्या आवडतात, असे निरीक्षण तो नोंदवतो. ‘बच्चन पांडे’च्या निमित्ताने हातात बंदुका घेऊन, अंगात विचित्र पोशाख धारण करून, चेहऱ्याची रूपरेषाही अगदी गंभीर आणि गुंडाप्रमाणे दिसावी असा एकलकोंडी राक्षसी मनोवृत्तीचा गृहस्थ आपल्यासमोर येतो.  बच्चन पांडे हा एक गँगस्टर असून त्याचा भूतकाळ आणि त्याची ओळख शोधून काढून त्याच्यावर माहितीपट करण्याचे धाडस करणारे दोन अभ्यासू माहितीपटकार त्याच्या शोधात असतात. त्यांच्या शोधातून ही कथा रंगत जाते. अक्षयच्या अशा चित्रपटांचा शेवट हा अनेकदा गंभीर असतो. त्यामुळे विनोदपटापलीकडे काही छुपा संदेश आहे का यावर बोलताना यात ना कुठला तथाकथित रहस्यमयी भूतकाळ उलगडण्याचा प्रयत्न नाही की संदेशही दिलेला नाही. हा केवळ एक मनोरंजनपट आहे त्याशिवाय काही नाही,  असे त्याने स्पष्ट केले. 

अर्शद – अक्षय वीस वर्षांनंतर एकत्र

२००२ साली आलेल्या ‘जानी दुश्मन – एक अनोखी कहानी’ या हिट ठरलेल्या रहस्यपटामुळे अर्शद आणि खासकरून अक्षयला एक नवी ओळख मिळाली. त्यानंतर हे दोघेही एकत्र असे कुठल्या चित्रपटांमध्ये दिसलेच नाहीत. अर्शद वारसीने ‘जॉनी एलएलबी’ हा चित्रपट केला तेव्हा त्याच्या दुसऱ्या भागात अक्षय कुमार दिसला. तिथेही हे दोघे एकत्र येणे घडले नाही. पुढील काही वर्षांत हे दोघे एकत्र दिसतील अशी चर्चाही कुठेच नव्हती. २०२२ मध्ये मात्र हे चित्रच पालटले आणि साजिद नाडियादवालांमुळे ‘बच्चन पांडे’ या चित्रपटात अर्शद आणि अक्षय हे दोन समकालीन लोकप्रिय अभिनेते २० वर्षांनी रुपेरी पडद्यावर पुन्हा एकत्र आले.

संहितेची फक्त एकच ओळ वाचून निवडला ‘गुड न्यूज’

चित्रपट निवडताना संहितेतली केवळ एक ओळ मला आवडली तरी मी पुढे संहिता ऐकत नाही. सरळ होकार देतो, असा खुलासा यावेळी अक्षयने केला. ‘‘करण जोहर एकदा माझ्याकडे एक कथा घेऊन आला होता. त्याने मला तासाभरापेक्षाही जास्त वेळ कथा ऐकवली होती. पुढल्या वेळी जेव्हा आम्ही भेटलो तेव्हा सहज बोलता बोलता त्याने ‘गुड न्यूज’ या चित्रपटाची कथा एका ओळीत ऐकवली. मला ती आवडली आणि त्याचक्षणी मी त्याला सांगितले की तू तासभर जी कथा मला ऐकवलीस त्यापेक्षा मी हा ‘गुड न्यूज’ चित्रपट तुझ्याबरोबर करतो असे सांगून मी मोकळा झालो’’, अशी आठवण त्याने सांगितली. 

दाक्षिणात्य – हिंदूी असा भेद नको !

अक्षयला सतत आपण दाक्षिणात्य चित्रपटांच्या रिमेकमध्ये काम करतो म्हणून ओळखले जाऊ नये असे वाटते. ‘‘ ‘लक्ष्मी’, ‘राऊडी राठोड’ अशा काही थोडय़ाच दक्षिणेकडील रिमेक चित्रपटांमध्ये मी काम केले आहे. ‘एअरलिफ्ट’, ‘नमस्ते लंडन’, ‘पॅडमॅन’, ‘टॉयलेट एक प्रेमकथा’ असेही चित्रपट इथे झाले आहेत, ज्यात मी मुख्य भूमिकेतून काम केले आहे त्यामुळे हे वास्तवही नाकारू नये की बॉलीवूडच्या चित्रपटांचेही दक्षिणेत रिमेक बनतात’’, अशा शब्दांत त्याने दाक्षिणात्य – हिंदूी चित्रपटांच्या तुलनेबद्दल आणि एकूणच रिमेकच्या चर्चाबदद्ल नाराजी व्यक्त केली. 

विनोदी शैलीतील चित्रपटात काम करणे, दिसणे आणि अशा कथा साकारणे हे फारच कठीण असते ज्याची पर्वा फारशी कोणाला नाही. प्रेमकथा लिहिणं फार सोपं आहे पण विनोदीकथा लिहिणं फार कठीण आहे. आज विनोदी कथाकारांना तो दर्जा मिळतोय, पण फारच संथ गतीने.. तरीही आज विनोदी कथाकारांना चांगले पैसेही मिळत आहेत याचा आनंद आहे कारण तेच विनोदी चित्रपटांचा चेहरा आहेत.-अक्षय कुमार