कमाल आर खानचं प्रत्येक ट्विट चर्चेचा विषय ठरतं. विविध विषयांवर कोणीही विचारलेलं नसताना हा स्वयंघोषित चित्रपट समीक्षक त्याची मतं मांडतो. सेलिब्रिटी त्याच्या ट्विटकडे फारसं लक्ष देत नाहीत. पण, नेटकरी मात्र त्याच्या ट्विटची आतुरतेने वाट पाहात असतात. काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या हृतिक- कंगना वादामध्येही त्याने उडी घेत कंगनाच्या बहिणीवर निशाणा साधला होता. त्यानंतर आता केआरकेने आणखी एक सनसनाटी दावा केलाय.
अभिनेत्री कंगना रणौत आणि तिची बहिण रंगोली गेल्या काही दिवसांपासून हृतिक रोशन आणि आदित्य पांचोलीवर जे काही आरोप लावत आहे, त्याच्या अनुषंगाने केआरकेने एक उपरोधिक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्याने करिना कपूर सोबतचा एक फोटो पोस्ट केला आणि त्यासोबत लिहिलं करिना आणि मी जवळपास ४ वर्षे रिलेशनशिपमध्ये होतो. माझ्याकडे सध्या ही गोष्ट सिद्ध करण्यासाठी पुरावा म्हणून फक्त हा फोटोच आहे.
https://twitter.com/kamaalrkhan/status/917612068429107200
वाचा : ‘शोले’मध्ये ठाकूरची भूमिका साकारणार होते धर्मेंद्र, पण…
हे ट्विट करत केआरकेने त्याच्या ट्विटमध्ये कंगना रणौत आणि रंगोलीच्या नावाचे हॅशटॅगही जोडले. त्याच्या या ट्विटनंतर काही युजर्सनी खास शैलीत प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. केआरकेने हे सर्व विनोदी अंदाजात केलं असलं तरीही करिना यावर का प्रतिक्रिया देणार हे पाहणं, महत्त्वांचं ठरणार आहे. कारण, आपल्या नावाचा चुकीच्या पद्धतीने वापर करणाऱ्या व्यक्तींना करिनाने बऱ्याचदा धारेवर धरल्याची उदाहरणं याआधी पाहण्यात आली आहेत. त्यामुळे केआरकेविषयी ती काही प्रतिक्रिया देणार, की इतर सेलिब्रिटींप्रमाणे त्याच्याकडे दुर्लक्ष करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
Pehli baar ek Acha joke mara hai. Mazaa aa gaya
— Fayaz (@fayaz_rocky) October 10, 2017
KRK next is u…. pic.twitter.com/bgfREkqWyL
— amitdnale (@Amit_Nale) October 12, 2017
Bhaisahab bobby darling ko bhool gaye? pic.twitter.com/XkfZDb25NW
— kunal #kick (@kunnu_kick) October 10, 2017