करोना व्हायरसच्या तडाख्यामुळे सध्या भारतासह जगभरात चिंतेची स्थिती उद्भवली आहे. लाखो लोकांना करोना व्हायरसचा फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे. विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. सध्याच्या घडीला भारतासह संपूर्ण जग करोना विषाणूविरोधात लढत आहे. उद्योगधंदे, कार्यालये, चित्रपटाची चित्रीकरणे… काही बंद आहे. क्रीडास्पर्धांनाही ‘ब्रेक’ लागला आहे. करोनाचा फैलाव टाळण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी १४ एप्रिलपर्यंत लॉकडाउनची घोषणा केली होती. त्यातच महाराष्ट्रात लॉकडाउन वाढवण्यात आला असून तो किमान ३० एप्रिलपर्यंत नक्की असणार आहे. अशा परिस्थितीमध्ये लोकप्रिय कपल म्हणजे टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा हे दोघे घरात झकास वेळ घालवत आहेत.

अभिनेत्री अनुष्का शर्माने आपल्या इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट केली आहे. त्यात या दोघांनी घरगुती पाणी-पुरी आणि बेसन बर्फीचा आस्वाद घेतला असल्याचे तिने स्पष्ट केले आहे. तिने पाणी-पुरी आणि बेसन बर्फी दोन्हीचा फोटो पोस्ट करून चाहत्यांनाही प्रोत्साहन दिलं आहेत.

तर, दुसरीकडे विराट कोहलीने अनुष्का आणि त्याचा एक रोमँटिक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोमध्ये विराट आणि अनुष्का झोपले आहेत. त्यांच्या बरोबर त्यांचा कुत्रादेखील तेथे झोपला आहे आणि अनुष्का कुत्र्याचे चुंबन घेत आहे. या फोटोवर चाहत्यांनी लाईक्सचा पाऊस पाडला आहे.

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी पंतप्रधान सहाय्यता निधीत यथाशक्ती मदतीचे आवाहन केल्यानंतर अनुष्का आणि विराटने प्राधान्याने यात मदत केली होती. तसेच, “घरात राहा, सुरक्षित राहा”, असे संदेशही या जोडीने दिला होता.