बिग बी अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असलेला मराठी सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार नाही. ‘एबी आणि सीडी’ असं या चित्रपटाचं नाव असून, त्यात अमिताभ यांच्याबरोबर विक्रम गोखले यांनी भूमिका साकारली आहे. हा सिनेमा लॉकडाउनच्या आधी रिलिज करण्यात आला होता. मात्र, त्याचवेळी चित्रपटगृह बंद करण्यात आले होते.
अमिताभ बच्चन या सिनेमा मुख्य भूमिकेत आहेत. त्यांच्यासोबत विक्रम गोखले यांनी काम केलं आहे. लॉकडाउन होण्याआधीच हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. मात्र, करोनाचा संसर्ग वाढत असल्यानं प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सरकारनं चित्रपटगृह बंद करण्याचे आदेश त्यावेळी दिले. यावेळी प्रदर्शित झालेल्या इतर सिनेमाच्या निर्मात्यांनी त्यांचे सिनेमे पुन्हा प्रदर्शित करणार असल्याचं सांगितलं. मात्र, ‘एबी आणि सीडी’च्या निर्मात्यांनी सिनेमा पुन्हा प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला.
‘अमर उजाला’नं दिलेल्या वृत्तानुसार चित्रपटाचे निर्माते अक्षय बर्दापूरकर यांनी दूजोरा दिला आहे. ‘परिस्थिती पूर्वपदावर येताना दिसत नाही. त्यामुळे आधी लोकांची सुरक्षा नंतर इतर गोष्टी हे लक्षात घेऊन आम्ही हा सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला आहे. हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यासंदर्भात अमॅझॉन प्राईमसोबत चर्चा सुरू आहे, अशी माहिती बर्दापूरकर यांनी दिली.
अमिताभ बच्चन यांचे इतरही तीन सिनेमे यावर्षी रिलीज होणार असून करोनाचा धोका लक्षात घेऊन त्यांच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. या सिनेमांमध्ये चेहरे, झुंड, आणि गुलाबो सिताबो यांचा समावेश आहे.