भारतीय संघाचा धडाकेबाज फलंदाज युवराज सिंग लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. अभिनेत्री, मॉडेल हेजल किचच्या प्रेमात क्लिन बोल्ड झालेला युवराजने आपल्या लग्नाची तारीख पक्की झाली आहे. आयुष्यभराच्या पार्टनरशिपसाठी युवीने हेजलची निवड केली होती. बऱ्याच दिवसांपासून एकमेकांसोबत एकत्र वेळ घालविल्यानंतर युवराज आणि हेजल यांनी काही दिवसांपूर्वी गुपचूप साखरपूडा केला होता. साखरपुडा झाल्यानंतर युवराजच्या लग्नाला त्याचा जर्सीचा नंबर असलेल्या १७ व्या सालाच्या सुरुवातील तो लग्न बेडीत अडकेल अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. पण युवी आपल्या वाढदिवाच्या पुर्वीच हेजलला आपल्या घरी घेऊन येणार आहे. युवराजचा वाढदिवस १२ डिसेंबरला असतो. त्यामुळे दिवाळीच्या मुहूर्तावरच युवी-हेजलच्या लग्नाचा बार वाजणार असल्याचे निश्चित झाले आहे. ३० नोव्हेंबरला युवराज-हेजल लग्न बेडीत अडकणार आहेत. दोघांच्या प्रेम फुलत असताना काही काळासाठी दुरावाही निर्माण झाला होता. हेजलने युवीचा फोन उचलणे बंद केले होते. हेजलचा प्रतिसाद मिळत नसल्याने युवीने तिला फेसबुक फ्रेंडलिस्टमधून देखील बेदखल केले होते. पण अखेर दोघांच्यातील वाद मिटला.

इंडोनेशियातील बाली येथे ११ नोव्हेंबरला दोन्ही कुटुंबियांच्या उपस्थितीत युवी-हेजलचा साखरपुडा झाला होता. गेली अनेक दिवस माध्यमांमधून दोघांच्या प्रेमप्रकरणाची चर्चा होत होती. हरभजन सिंगच्या लग्नात युवी व हेजल एकत्र आल्यामुळे साऱ्यांच्याच भुवया उंचवल्या होत्या.

हेजल किच हिने सलमान खानच्या बॉडीगार्ड या चित्रपटात करिना कपूरची मैत्रीण आणि सलमान खानच्या पत्नीची भूमीका साकारली होती. तसेच ‘बिग बॉस’ या रियालिटी शोच्या एका पर्वात ती सहभागी झाली होती. विदेशात साखरपुडा करणारा युवीचा लग्न सोहळा भारतात पार पडणार का? या बाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता लागून राहिली आहे.