ऐंशीच्या दशकात छोट्या पडद्यावर गाजलेली ‘मालगुडी डेज’ ही मालिका आपल्यापैकी अनेकांना आठवत असेल. आर.के.नारायण लिखित आणि शंकर नाग दिग्दर्शित ‘मालगुडी डेज’ने त्या काळात समीक्षकांसह सगळ्यांचीच वाहवा मिळवली होती. या मालिकेतील अनेक कथा आजही प्रेक्षकांच्या लख्ख स्मरणात आहेत.  या मालिकेचे मालकीहक्क असणाऱ्या राजश्री या कंपनीने ही संपूर्ण मालिका युट्युबवर टाकण्याचे ठरवले आहे. त्यामुळे रसिकांना पुन्हा एकदा जुन्या काळात जाऊन ‘मालगुडी डेज’चा आनंद लुटता येणार आहे.