बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आपला ‘दबंग ३’ हा आगामी चित्रपट घेऊन लवकरच चाहत्यांच्या भेटीला येत आहे. अलीकडेच या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला होता. तेव्हापासूनच चाहते चित्रपटाच्या ट्रेलरची आतुरतेने वाट पहात होते. अखेर बहुचर्चित बहुप्रतिक्षीत ‘दबंग ३’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

३ मिनिटे २२ सेकंदांच्या या ट्रेलरमध्ये सलमान आपल्या दबंग शैलीत गुंडांबरोबर फाईटींग करताना दिसत आहे. सलमानच्या चाहत्यांनी अगदी काही मिनिटांतच या ट्रेलरला सोशल मीडियावर जोरदार व्हायरल करण्यास सुरुवात केली आहे. पहिल्या ३० मिनिटांत तब्बल ४० हजारांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी या ट्रेलरबाबत आपल्या प्रतिक्रीया दिल्या आहेत. चाहत्यांना हा ट्रेलर खुप आवडला असून त्यांनी सलमानवर कौतुकाचा वर्षाव करण्यास सुरुवात केली.

‘दबंग – ३’ हा दबंग मालिकेतला अनुक्रमे तीसरा चित्रपट आहे. याआधी प्रदर्शित झालेल्या दोनही चित्रपटांनी बॉक्सऑफीसवर कोट्यवधी रुपयांची कमाई केली होती. तसेच या चित्रपटांमध्ये सोनाक्षी सिन्हा हीने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली होती. ‘दबंग – ३’ मध्ये सोनाक्षीच मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे. या शिवाय मराठी सुपरस्टार महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर ही देखील या चित्रपटामध्ये अभिनय करताना दिसेल.

दबंग चित्रपट मालिकेत सलमानने चुलबुल पांडे ही व्यक्तिरेखा साकारली आहे. हा चित्रपट फ्लॅशबॅक फॉरमॅटमध्ये तयार केला गेला आहे. यांत पोलिस अधिकारी होण्याच्या आधी चुलबुल कसा होता? हे कथानक दाखवले जाणार आहे. सलमानचा चाहता वर्ग पाहता याआधी प्रदर्शित झालेल्या ‘ट्यूबलाईट’, ‘रेस -३’ व ‘भारत’ या तीनही चित्रपटांनी तिकीट बारीवर काही खास कमाल केली नव्हती. या पार्श्वभूमिवर विचार ‘दबंग -३’ काय कमाल करतो हे नक्कीच पाहण्याजोगे ठरेल असे म्हटले जात आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dabangg 3 official trailer salman khan sonakshi sinha prabhu deva mppg
First published on: 23-10-2019 at 20:16 IST