अभिनेत्री दलजीत कौरने १८ मार्च रोजी यूके स्थित निखिल पटेलशी लग्न केले. यापूर्वी ती अभिनेता आणि बिग बॉस १६ फेम शालीन भानोटची लग्न केले होते. परस्पर मतभेदांमुळे दोघेही २०१३ मध्ये वेगळे झाले. प्रदीर्घ कायदेशीर लढाई लढल्यानंतर, दलजीत शालीनपासून विभक्त झाली आणि तिने आपले आयुष्य नव्याने सुरू केले. या अभिनेत्रीने घटस्फोटित आणि विधवा महिलांसाठी एक खास संदेश दिला आहे, ज्यामुळे त्यांचे मनोबल वाढू शकते.
हेही वाचा- अनुष्काबरोबरच्या पहिल्या भेटीतच केला होता विचित्र विनोद; खुद्द विराटने सांगितला ‘तो’ किस्सा
दिलजीतने इंस्टाग्रामवर एक लांबलचक पोस्ट लिहिली आहे, “आशा म्हणजे आशा, जर तुमच्यात स्वप्न पाहण्याची हिंम्मत असेल तर तुम्हाला ती पूर्ण करावी लागेल.” तसेच तिने लिहिलं आहे. “जेव्हा आयुष्य तुम्हाला खाली ओढून घेते आणि समाज तुम्हाला पटवून देण्याचा प्रयत्न करतो की तुम्ही ते का करू नये यासाठी लाखो नकारात्मक कारणे देतो. तेव्हा नेमकं तेच करावं.” असं तिने पोस्टमध्ये लिहिलं आहे.
दिलजीतने पुढे लिहिले की, “तुमच्या आयुष्याची व्याख्या कोणालाही ठरवू देऊ नका. तुमच्याकडे जगण्यासाठी फक्त एकच आयुष्य आहे, म्हणून तुमच्याकडे जे काही आहे ते सर्व आपल्या आयुष्याला द्या. तुमच्या मुलांना, मित्रांना आणि कुटुंबीयांना सांगा की आनंदाची व्याख्या स्टिरियोटाइपद्वारे केली जात नाही, ती अनुभवांवरून निश्चित केली जाते. “पुन्हा चूकीचे होणे हे सर्वात वाईट घडू शकते. पण, भीतीला तुमच्या भविष्यात अडथळा होऊ देऊ नका. संधी द्या, स्वप्न पहा, आशा ठेवा, आनंदाचा पाठलाग करा.
हेही वाचा- ..अन् शाहरुखने भर पार्टीत फराह खानच्या पतीच्या लगावली होती कानशिलात; ‘या’ कारणामुळे झालं होतं भांडण
दलजीत कौरने एनआरआय निखिल पटेलसोबत लग्न केल्यानंतर तिला सोशल मीडियावर खूप ट्रोल केले जात आहे. तिला ‘गोल्ड डिगर’ म्हणूनही संबोधले जात आहे, या प्रत्युत्तरात आता अभिनेत्रीने ही पोस्ट करून सर्वांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.