दिग्दर्शक शकुन बत्रा यांचा आगामी चित्रपट ‘गहराइयां’ सोशल मीडियावर बऱ्याच काळापासून चर्चेत आहे. या चित्रपटात अभिनेत्री दीपिका पादुकोण, सिद्धांत चतुर्वेदी आणि अनन्या पांडे यांच्या मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून सध्या चर्चेत आहे. ट्रेलरमध्ये दीपिकाने काही इंटिमेट सीन्स दिले असल्याचे दिसत आहे. आता चित्रपटातील सर्व कलाकार हे चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसत आहेत. दरम्यान दीपिका पदुकोणने घातलेल्या कपड्यांमुळे तिला ट्रोल केले जात आहे.

‘गहराइयां’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दीपिकाने भगव्या रंगाचा लाँग वनपिस परिधान केला आहे. या लूकमध्ये ती अतिशय हॉट दिसत आहे. पण या ड्रेसमुळे दीपिकाला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. एका यूजरने तर थेट ‘उर्फी जावेदकडून दीपिकाला प्रेरणा मिळाली आहे’ असे म्हटले आहे.

सध्या सोशल मीडियावर दीपिका ‘गहराइयां’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान घातलेल्या कपड्यांमुळे चर्चेत आहे. या लूकमध्ये ती अतिशय हॉट दिसत होती. एका यूजरने ‘बॉलिवूड अभिनेत्री आता उर्फी जावेदला कॉपी करतात’ असे म्हणत सुनावलं आहे. तर दुसऱ्या एका यूजरने ‘दीपिका आणि अनन्या दोघींनाही उर्फी जावेदकडून प्रेरणा मिळाली आहे’ असे म्हटले आहे. तिसऱ्या एका यूजरने खूप वाईट ड्रेस आहेत असे म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दीपिका पादुकोण, सिद्धांत चतुर्वेदी, अनन्या पांडे आणि धैर्य कारवा यांच्या व्यतिरिक्त या चित्रपटात अभिनेता नसीरुद्दीन शाह आणि रजत कपूर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हा चित्रपट येत्या ११ फेब्रुवारी रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म ‘अमेझॉन प्राइम व्हिडीओ’वर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन शकुन बत्रा करत आहेत तर करण जोहरचं धर्मा प्रॉडक्शन आणि व्हायकॉम १८ या चित्रपटाचे निर्माते आहेत. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे.