अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘गहराइयां’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात सिद्धांत आणि दीपिका पदुकोण यांची हॉट केमिस्ट्री पाहायला मिळाली. ज्याची बरीच चर्चा देखील झाली. दीपिका पदुकोणनं तर लग्नानंतर पहिल्यांदाच या चित्रपटात एवढे हॉट सीन दिले आहेत. पण जेव्हा दीपिकाच्या आई- वडिलांनी तिचा हा चित्रपट पाहिला तेव्हा तिच्या या बोल्ड भूमिकेबाबत किंवा हॉट इंटिमेट सीनबाबत त्यांचं म्हणणं काय होतं याबाबतचा खुलासा दीपिकानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत केला आहे.

दीपिकाची मुख्य भूमिका असलेल्या ‘गहराइयां’ चित्रपटाता प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. आता यावर दीपिकाच्या आई- वडिलांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. NDTV ला दिलेल्या मुलाखतीत दीपिकानं स्वतःच याविषयी खुलासा केला. ती म्हणाली, ‘वैयक्तीक पातळीवर माझ्या कुटुंबीयांना हा चित्रपट पचवणं थोडं कठीण गेलं. माझ्या संपूर्ण कुटुंबानं हा चित्रपट पाहिला. त्यामुळे त्यांना वाटतं की अशा प्रकारच्या प्रसंगातून जाणं कठीण आहे. या चित्रपटात मानसिक आरोग्यावर भाष्य केलं गेलंय. माझ्या कुटुंबीयांनी माझ्या अभिनयाचं कौतुक केलं. ज्या प्रकारे मानसिक आरोग्याचा विषय या चित्रपटात हाताळला गेला आहे आणि यासाठी मी केलेला अभिनय ही गोष्ट माझ्या आईवडिलांसाठी खूप मोठी होती.’

दीपिका म्हणाली, ‘या चित्रपटात साकारलेल्या अलिशाच्या व्यक्तिरेखेशी काही ठिकाणी मी सहमत नाही. कारण या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांनी जज कराण्यापेक्षा त्यांनी ती भूमिका स्वतःशी कनेक्ट करावी असं मला वाटत होतं. पण असं झालं नाही. अनेकांना ही भूमिका आवडली देखील नसेल. कारण लोक याच्याशी सहमत असावेत अशी ती भूमिका नाहीये. पण या जगात अलिशासारख्या व्यक्ती असतात. चित्रपटाची कोणतीही भूमिका खूप विचार करून लिहिलेली असते. जी तुमच्या खऱ्या आयुष्यातही अस्तित्वात असते.’