अभिनेता सुशांत सिंह राजपूतची आत्महत्येची घटना सर्वांच्याच मनाला चटका लावून गेली. त्याच्या आत्महत्येमागे नैराश्य हे कारण असावं अशी चर्चा आहे. संपूर्ण कलाविश्वातून त्याच्या आत्महत्येवर शोक व्यक्त करण्यात येत आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोणसुद्धा एकेकाळी नैराश्याला सामोरी गेली होती. त्यामुळे मानसिक स्वास्थ्याबद्दल जनजागृती करणे किती गरजेचं आहे हे तिने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं. त्याचसोबत ‘गुन्हेगार गुन्हा करतात. लोक आत्महत्या करत नाहीत तर आत्महत्येने मरतात’, अशी पोस्ट तिने माध्यमांसाठी लिहिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘माध्यमांतील माझ्या प्रिय मित्र-मैत्रिणींनो, गुन्हेगार गुन्हा करतात. लोक आत्महत्या करत नाहीत तर ते आत्महत्येने मरतात. अत्यंत गंभीर क्लेशातून ही कृती घटने’, असं तिने लिहिलं. त्याचसोबत तिने मानसिक आरोग्याचं महत्त्व अधोरेखित करत एक ट्विट केलं आहे. ‘तुम्ही बोला, व्यक्त व्हा, मदत मागा, संवाद साधा. तुम्ही एकटे नाही आहात. आपण सर्वजण या प्रवासात एकमेकांसोबत आहोत आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे उमेद आहे’, असं ती म्हणाली.

आणखी वाचा : सुशांत सिंह राजपूत… का?????

रविवारी दुपारच्या सुमारास सुशांत सिंह राजपूतने मुंबईतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येमागचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र गेल्या काही महिन्यांपासून तो नैराश्यात असल्याचं म्हटलं जात आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deepika padukone post on sushant singh rajput suicide ssv
First published on: 15-06-2020 at 11:32 IST