अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण या दोघांनी जरी त्यांच्या नात्याबद्दल कधी खुलेपणाने वाच्यता केली नसली तरी आता हे एक उघड सत्य आहे. मीडिया रिपोर्टनुसार हे दोघेही सध्या लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहेत आणि दोघांनी हा निर्णय केवळ ‘पद्मावती’ सिनेमासाठी घेतला आहे असे म्हटले जात आहे.
‘पद्मावती’चा सेट सध्या दहिसरमध्ये उभारण्यात आला आहे. रणवीर आणि दीपिका यांच्या घरापासून हा सेट फार लांब असल्यामुळे प्रवासातला वेळ वाचवण्यासाठी हे दोघं सध्या दहिसरमध्ये राहत आहेत. रणवीरचं स्वतःचं दहिसरमध्ये घर आहे. तो या घराचा वापर वेगवेगळ्या सिनेमातल्या व्यक्तिरेखेची तयारी करण्यासाठी करतो. पण सध्या तो पद्मावतीच्या सेटवर जाणं बरं पडेल म्हणून या घरी राहत आहे. दीपिकाही याच कारणामुळे त्याच्यासोबत या घरात राहत आहे असे म्हटले जात आहे. इतके दिवस त्यांच्या येण्या- जाण्यामुळे प्रसारमाध्यमांच्या नजरेत ही बाब आली आणि हे दोघंही एकाच घरात राहात असल्याचे स्पष्ट झाले. पण ते अधिकृतरित्या लिव्ह इनमध्ये आहेत की नाही हे अजून तरी कळू शकले नाही, असे डेक्कन क्रोनिकलने प्रसिद्ध केलेल्या वृत्तात म्हटले आहे.
Sachin A Billion Dreams box office collection: सचिनने घेतली कोटींच्या कोटी उड्डाणे
दोघेही संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावती’ या सिनेमाचा मुख्य भाग आहेत. आतापर्यंत या दोघांनी एकत्रित केलेल्या सिनेमांना प्रेक्षकांनी पसंत केले आहे. त्यांच्या पडद्यामागील केमिस्ट्रीप्रमाणेच त्यांची पडद्यावरील केमिस्ट्रीही अनेकांना आकर्षित करते. त्यामुळेच पद्मावती सिनेमाच्या पहिल्या झलकची त्यांचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यातच या सिनेमाच्या निर्मात्यांनी कथेपासून ते पात्रांपर्यंतची माहिती गोपनीय ठेवल्याने सिनेमाविषयीची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत जात आहे.
संजय लीला भन्साळी दिग्दर्शित या सिनेमात ‘पद्मावती’च्या भूमिकेत दीपिका पदुकोण दिसणार असून, अल्लाउद्दीन खिलजीच्या भूमिकेत रणवीर सिंग दिसणार आहे. याशिवाय दीपिकाच्या नवऱ्याची म्हणजेच रवल रतन सिंग या भूमिकेत शाहिद कपूर झळकणार आहे. आदिती राव हैदरीला अल्लाउद्दीन खिलजीची बेगम दाखविण्यात येणार आहे. रणवीर आणि दीपिका तिसऱ्यांदा संजय लीला भन्साळींसोबत काम करणार आहे. याआधी या दोघांनी रामलीला, बाजीराव मस्तानी या सिनेमांत काम केले होते.