अभिनेता अभिषेक बच्चन, यामी गौतम आणि निम्रत कौर यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘दसवी’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटात अभिषेक बच्चन नेहमीपेक्षा एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. ट्रेलरमधील त्याच्या मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेनं सर्वांची मनं जिंकली आहेत. या ट्रेलरमध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोणचा देखील उल्लेख आहे. यावर आता दीपिकानं प्रतिक्रिया दिली आहे.

अभिषेक बच्चनच्या ‘दसवी’ चित्रपटात एक डॉयलॉग आहे, ‘रणवीर लव्स दीपिका’ यावर अभिषेक म्हणतो, ‘एव्हरीवन लव्ह दीपिका’ दीपिकाचा हा उल्लेख ट्रेलरमध्येही पाहायला मिळत आहे. यावर आता अभिनेत्री दीपिका पदुकोणनं प्रतिक्रिया दिली आहे. दीपिकानं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर या ट्रेलरची झलक शेअर करत ‘दसवी’च्या टीमसाठी खास संदेशही दिला आहे.

आणखी वाचा- “मी कधी चुकलो तर…” एकता कपूरच्या ३ वर्षीय मुलाची स्मृती इराणींसाठी खास पोस्ट

दीपिका पदुकोणनं तिच्या इन्स्टाग्रामवर लिहिलं, ‘या चित्रपटात मला एवढं प्रेम दिल्याबद्दल ‘दसवी’च्या टीमचे खूप आभार. चित्रपटाच्या यशासाठी खूप साऱ्या शुभेच्छा.’ दीपिकाची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चेत आहे.

आणखी वाचा- तब्बल ३ महिन्यांनंतर समोर आलं विकी- कतरिनाच्या लग्नाचं धक्कादायक सत्य, विवाहित असूनही…

मॅडॉक फिल्म प्रॉडक्शन आणि तुषार जलोटा यांचं दिग्दर्शन असेलला हा चित्रपट नेटफ्लिक्सवर ७ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात यामी गौतम एका धाकड पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. तर अभिनेत्री निम्रत कौर अभिषेक बच्चनच्या पत्नीची भूमिका साकारताना दिसणार आहे.