अभिनेत्री दीपिका पदुकोणचा ‘गहराइयां’ चित्रपट येत्या ११ फेब्रवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सध्या दीपिका या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बीझी आहे. ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. विशेषतः या प्रमोशनसाठी दीपिकानं घातलेल्या बोल्ड आउटफिट्सची सोशल मीडियावर सातत्यानं चर्चा होताना दिसत आहे. ‘गहराइयां’ चित्रपटात अनेक बोल्ड दृश्य आहेत. ज्यावरून दीपिकाला मुलाखतींमध्ये वेगवेगळे प्रश्न विचारले गेले आहेत आणि तिनंही बिनधास्त या प्रश्नांची उत्तर दिली आहेत. आता ‘गहराइयां’ सारखा बोल्ड चित्रपट निवडण्याचं कारण दीपिकानं स्पष्ट केलं आहे.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ‘गहराइयां’ चित्रपटातील बोल्ड दृश्य आणि असा बोल्ड चित्रपट निवडण्यामागचं कारण दीपिकानं सांगितलं. यासोबतच अशा प्रकारच्या बोल्ड चित्रपटाची निवड करण्याचं सर्व श्रेय तिनं पती रणवीरला दिलं आहे. ‘रणवीरमुळेच मी एवढी बोल्ड होऊ शकले’ असं दीपिका या मुलाखतीमध्ये म्हणाली.

Sharad Pnkshe reaction on Article 370
यामी गौतमच्या ‘आर्टिकल ३७०’ चित्रपटाबद्दल शरद पोंक्षेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “काँग्रेसने काय वाटोळं…”
Salman Khan announces new film Sikandar on Eid
सलमान खानने चाहत्यांना दिली ‘ईदी’, नव्या चित्रपटाची केली घोषणा, दाक्षिणात्य दिग्दर्शक सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
vfx oscar winner tim mcgovern
व्यक्तिवेध : टिम मॅकगव्हर्न

इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत दीपिकानं ‘गहराइयां’मध्ये बोल्ड भूमिका साकारण्याचं श्रेय रणवीरला दिलं. ती म्हणाली, ‘हे सर्व मी रणवीरमुळे करू शकले. तो नेहमीच मला नवीन काहीतरी करण्यासाठी प्रोत्साहन देतो. मी देखील वेळोवेळी त्याला प्रोत्साहन देते मात्र मला त्याच्या सारखं व्यक्त होता येत नाही. मी हा चित्रपट त्यानं प्रोत्साहन दिल्यामुळेच स्वीकारला. त्याच्यामुळेच मी एवढी बोल्ड निवड करू शकले.’

दरम्यान शकुन बत्रा दिग्दर्शित ‘गहराइयां’ चित्रपटात अनन्या पांडे, दीपिका पदुकोण, धैर्य कारव आणि सिद्धांत चतुर्वेदी यांच्या मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट येत्या ११ फेब्रुवारीला ओटीटी प्लॅटफॉर्म अमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे. चित्रपटात आधुनिक नातेसंबंध आणि त्यातील गुंतागुंत यावर प्रकाश टाकण्यात आला आहे.