scorecardresearch

दीपिका पदुकोणने उघड केले चमकदार त्वचा आणि ताजेतवाने राहण्यामागचे गुपित, म्हणाली…

नुकतंच दीपिकाने तिच्या चमकदार त्वचा आणि ताजेतवाने राहण्याचे गुपित उघड केले आहे.

बॉलिवूडची मस्तानी अर्थात दीपिका पदुकोण नेहमीच तिच्या लूकसाठी ओळखली जाते. बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी अभिनेत्रींपैकी एक म्हणून दीपिकाला ओळखले जाते. दीपिकाने तिच्या दमदार अभिनयामुळे स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. दीपिका पदुकोण ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. ती नेहमी विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. नुकतंच दीपिकाने तिच्या चमकदार त्वचा आणि ताजेतवाने राहण्याचे गुपित उघड केले आहे.

दीपिका ही नेहमी तिच्या अभिनयासह सौंदर्यामुळेही चर्चेत असते. नुकतंच दीपिकाने तिच्या चमकदार त्वचा आणि ताजेतवाने राहण्याचे गुपित चाहत्यांसोबत शेअर केले आहे. तिने इन्स्टाग्रामवर याबाबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात ती तिच्या आवडत्या पाण्याच्या बाटलीसोबत एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात कशाप्रकारे तिची पाण्याची बाटली प्रत्येकवेळी तिच्यासोबत असते, याबद्दल तिने सांगितले आहे. तसेच शूटींगदरम्यान किंवा एखाद्या प्रोजेक्टसाठी बाहेर जाताना कशाप्रकारे ती तिच्या याच बाटलीतून सतत पाणी पिताना दिसते, हे देखील तिने सांगितले आहे.

दीपिकाने हा व्हिडीओ शेअर करतेवेळी त्यात ‘फक्त आम्ही दोघे’ असे म्हटले आहे. तसेच दीपिकाच्या मते, नियमित पाणी प्यायल्याने तुमची त्वचा चमकदार होते. तसेच त्वचाही ताजेतवानेही राहते. त्यामुळे प्रत्येकाने नियमित पाणी प्यावे. हेच माझ्या चमकदार त्वचेमागचे रहस्य आहे. दरम्यान हा व्हिडीओ शेअर करताना तिने चाहत्यांना या पाण्याच्या बाटलीला काय नाव ठेवायचे? असा प्रश्नही केला आहे.

यावर तिच्या अनेक चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. यात तिचा एक चाहता म्हणाला की याचे नाव ‘डिपी सिपी’ असे असले पाहिजे. तर एकाने ‘डिपसिप’ असे ठेवू असे म्हटले आहे. दरम्यान दीपिका ही फिटनेस फ्रिक अभिनेत्री म्हणून ओळखले जाते. ती नेहमी तिच्या व्यस्त वेळातून वेळ काढत वर्कआऊट करताना दिसते.

“…वेळ लवकर निघून जाते”, ‘इंडियन आयडल’च्या पहिल्या पर्वाचा विजेता अभिजीत सावंतची भावूक पोस्ट

दरम्यान दीपिका पदुकोण ही सध्या शाहरुख खानसोबत पठाण या चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. यासाठी ती स्पेनला रवाना झाली आहे. त्यासोबत ती लवकरच ऋतिक रोशन आणि अनिल कपूरसोबत फायटर चित्रपटातही झळकणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Deepika padukone reveals secret behind her glowing skin know what she said nrp

ताज्या बातम्या