सोशल मीडिया हे असं एक माध्यम आहे की जेथे कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. गेल्या काही दिवसापासून ट्विटरवर #NotMyDeepika हा हॅशटॅग ट्रेण्ड होतोय. दीपिकाच्या चाहत्यांनी तिच्यासाठी हा खास ट्रेण्ड सुरु केला असून तिने चित्रपट दिग्दर्शक लव रंजन यांच्या आगामी चित्रपटात काम करु नये यासाठी हा ट्रेण्ड व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काही दिवसापूर्वी अभिनेता रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण यांनी चित्रपट दिग्दर्शक लव रंजन यांची भेट घेतली. यावेळी लव रंजन यांच्या ऑफिसच्या बाहेर दीपिका आणि रणबीरला एकत्र पाहण्यात आलं. त्यामुळे लव रंजन यांच्या नव्या चित्रपटात दीपिका रणबीर एकत्र स्क्रीन शेअर करणार अशी चर्चा सुरु झाली. ही चर्चा सुरु झाल्यानंतर दीपिकाचे चाहते नाराज झाले आणि त्यांनी सोशल मीडियावर #NotMyDeepika हा ट्रेण्ड सुरु केला.

#NotMyDeepika या ट्रेण्डच्या माध्यमातून दीपिकाच्या काही चाहत्यांनी तिला लव रंजन यांच्यासोबत काम न करण्याची विनंती केली आहे. त्यासोबतच जर तू हा चित्रपट केलास तर तुझे चाहते तुझ्यापासून दुरावतील असंही त्यांनी सांगितलं आहे.

लव रंजन यांचे अनेक चित्रपट स्त्रियांविरोधी आशयाचे असतात. त्यामुळे अनेक वेळा त्यांच्या चित्रपटांवर टीकाही होते. त्यासोबतच #MeToo मोहिमेअंतर्गत एका अभिनेत्रीने लव रंजन यांच्यावर गैरवर्तनाचे आरोप केला होते, त्यामुळेच दीपिकाच्या चाहत्यांनी तिला लव रंजनसोबत काम करु नये, असं सांगितलं आहे.

दरम्यान, लव रंजन यांनी २०११मध्ये ‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटातून पहिल्यांदाच दिग्दर्शकीय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर त्यांनी ‘प्यार का पंचनामा २’, ‘सोनू के टीटू की स्वीटी’ आणि ‘दे दे प्यार दे’ असे काही चित्रपट दिले. यापैकी ‘सोनू के टीटू की स्वीटी’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल १०० कोटींची कमाई केली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deepika padukone visits luv ranjan named in metoo for new film notmydeepika trends ssj
First published on: 22-07-2019 at 12:56 IST