चित्रपटात सायनाची भूमिका साकारायला आवडेल- दीपिका पदुकोण

मला सायनावरील चरित्रपटात काम करायला आवडेल.

भारताची स्टार बँडमिंटनपटू सायना नेहवाल हिची भूमिका रूपेरी पडद्यावर साकारायला आवडेल, असे अभिनेत्री दीपिका पदुकोणने म्हटले आहे. काल मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात ती बोलत होती. दीपिका सुप्रसिद्ध बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांची मुलगी असून ती स्वत:देखील बॅडमिंटन खेळली आहे. यासंदर्भात बोलताना दीपिका म्हणाली की, मला सायनावरील चरित्रपटात काम करायला आवडेल. खरं तर आम्ही याआधी एकत्र बॅडमिंटनसुद्धा खेळलो आहोत, ती नक्कीच माझ्यापेक्षा चांगली खेळते, अशी आठवणही दीपिकाने या कार्यक्रमादरम्यान सांगितली. या कार्यक्रमाला सायना नेहवालही उपस्थित होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Deepika padukone would love to play saina nehwal onscreen