गेल्या काही महिन्यांपासून बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोण हॉलीवूडचा सुपरस्टार विन डिझेलसोबत ‘xXx’ या हॉलीवूडपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. नुकतेच दीपिकाने विन डिझेलसोबतचा खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यात  दीपिका लाकडी फळ्यांवर बसलेली दिसत असून विनसोबत ती गप्पा मारत आहे. नुकतेच काही दिवसांपूर्वी अमेरिकन स्टार सॅम्युअल एल जॅक्सनने दीपिकासोबतचा सेल्फी शेअर केला होता.
दरम्यान, दीपिका सध्या या चित्रपटासाठी भरपूर मेहनत घेत असून सेलिब्रेटी ट्रेनर यास्मीन कराचीवालाकडे तिचे ट्रेनिंग सुरू आहे. ‘xXx’ चित्रपटात दीपिका सरेनाची भूमिका साकारत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deepika padukones candid moment with vin diesel on the sets of xxx
First published on: 14-04-2016 at 14:59 IST