उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या कायमच विविध कारणांनी चर्चेत असतात. त्यांना कलाक्षेत्राचीही बरीच आवड आहे. त्या एक उत्तम गायिका आणि समाजसेविकाही आहेत. देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांच्याकडे एक ‘पॉवर कपल’ म्हणून पाहिले जाते. मात्र नुकतंच अमृता फडणवीसांच्या एका लूकवर चाहत्यांनी नाराजी दर्शवली आहे.

अमृता फडणवीस यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत त्या कामानिमित्त एका ठिकाणी गेल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी त्यांनी काळ्या रंगाचा टॉप आणि पँट परिधान केली होती.
आणखी वाचा : “…तरच लग्न करेन”, अमृता फडणवीसांनी देवेंद्र फडणवीसांना लग्नापूर्वी घातलेली अट

अमृता फडणवीस या लूकमध्ये अगदीच वेगळ्या दिसत होत्या. त्यांचा हा लूक पाहून काहींनी त्यांचे कौतुक केले आहे. तर काहींना मात्र त्यांचा हा लूक अजिबात आवडला नाही. त्यावरुन अनेकांनी कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत.

amruta fadnavis comment
अमृता फडणवीसांच्या व्हिडीओवरील कमेंट

आणखी वाचा : प्रत्येकीला वेगळा रंग, ब्लाऊजवर विशिष्ट संदेश अन्…; ‘बाईपण भारी देवा’मधील ‘मंगळागौर’ गाण्यासाठी वापरलेल्या साड्यांची ‘ही’ आहे खासियत

“देवेंद्र फडणवीसांनी मिळवलेला सर्व आदर, मान सन्मान या धुळीला मिळवत आहेत”, अशी कमेंट एकाने केली आहे. तर एकाने “याच कारणांनी देवेंद्र फडणवीस कधीच मुख्यमंत्री होऊ शकत नाही”, असे कमेंट करत म्हटले आहे. “अमृता फडणवीसांचे पती सत्तेत आहेत. किमान त्यांनी त्यांचा विचार करुन तरी जरा बरे कपडे घालावे”, अशी कमेंट एका व्यक्तीने केली आहे. “सर्व काही पैशांची कमाल आहे”, असे एकाने कमेंट करत म्हटले आहे.