राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कायमच चर्चेत असतात. पण त्यांच्यापेक्षा त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांची जास्तच चर्चा असते. त्या सोशल मीडियावर कायमच सक्रीय असल्याचे पाहायला मिळते. बँक अधिकारी, गायिका अशी ओळख असलेल्या अमृता फडणवीस यांचा मोठा चाहता वर्ग आहे. नुकतंच अमृता फडणवीसांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे त्या चर्चेत आल्या आहेत.

अमृता फडणवीसांनी नुकतंच न्यूयॅार्कच्या ‘भारत’ महोत्सवात हजेरी लावली. यावेळी त्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. या कार्यक्रमात त्यांनी देशभक्तीपर आणि इतर गाणी सादर केली. त्यांच्या गाण्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
आणखी वाचा : “तिची मतं, कृती मला पटत नाही, पण…”, देवेंद्र फडणवीसांनी अमृता फडणवीसांबद्दल मांडलं स्पष्ट मत, म्हणाले “महिलांनी इतकी…”

या व्हिडीओत अमृता फडणवीस या ‘दमादम मस्त कलंदर, अली दा पैला नम्बर’ हे गाणं गाताना दिसत आहेत. यावेळी त्या स्वत: मंचावर गाण्याच्या तालावर थिरकताना दिसत आहे.

अमृता फडणवीसांनी सादर केलेले हे गाणं ऐकण्यासाठी परदेशातील अनेक नागरिक उपस्थित आहेत. तसेच अमृता फडणवीसांच्या गाण्यावर यातील काही परदेशी मंडळी थिरकतानाही दिसत आहेत. त्यामुळे न्यूयॉर्कमध्ये अमृता फडणवीसांच्या गाण्याचा सूर घुमल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आहे.

आणखी वाचा : “…तरच लग्न करेन”, अमृता फडणवीसांनी देवेंद्र फडणवीसांना लग्नापूर्वी घातलेली अट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांच्याकडे एक ‘पॉवर कपल’ म्हणून पाहिले जाते. अमृता फडणवीसांना कलाक्षेत्राची आवड आहे. त्या उत्तम गायिका आणि समाजसेविकाही आहेत. त्या त्यांची मत कायमच ठामपणे मांडताना दिसतात.