scorecardresearch

“राजकारणात जायला हवं” म्हणत अमृता फडणवीसांनी दिले संकेत, म्हणाल्या “मोठे नुकसान…”

अमृता फडणवीस नुकतंच एका मुलाखतीदरम्यान राजकारणात येण्याबद्दलचे संकेत दिले आहेत.

“राजकारणात जायला हवं” म्हणत अमृता फडणवीसांनी दिले संकेत, म्हणाल्या “मोठे नुकसान…”
अमृता फडणवीस

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचं नुकतंच एक गाणं प्रदर्शित झालं. ‘मूड बना लिया’ असे या गाण्याचे बोल असून सध्या ते सोशल मीडियावर हिट ठरताना दिसत आहे. त्यांनी पहिल्यांदाच पंजाबी भाषेत गाणं गायलं आहे. अमृता फडणवीसांनी स्वतः हे गाणं गायलं असून त्या या गाण्यामध्ये डान्स करतानाही दिसत आहे. या गाण्यावरुन त्यांना ट्रोलही केले जात आहे. अमृता फडणवीस नुकतंच एका मुलाखतीदरम्यान राजकारणात येण्याबद्दलचे संकेत दिले आहेत.

देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी असण्याबरोबरच समाजसेविका आणि गायिका म्हणूनही अमृता फडणवीसांना ओळखले जाते. त्यांना कायमच त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे ओळखले जाते. नुकतंच एका मुलाखतीत त्यांना राजकारणात येण्याबद्दलचा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी थेट भाष्य केले.

“मी राजकारणात येण्याबद्दल याआधीही बोलली आहे. देवेंद्रजींनी पूर्णपणे राजकारणात म्हणजे समाजकारणात लोकांसाठी स्वत:ला झोकलेलं आहे. मी त्यांची अर्धांगिनी आहे. पण मला वेगवेगळ्या मुद्द्यांवरही लक्ष द्यायचं आहे. जिथे मी सामाजिक मुद्द्यांवर लक्ष देते. त्याबद्दल विविध प्रोजेक्ट करुन पुढे आणते. पण त्याबरोबर मला घराकडे आणि प्रोफेशन गाण्याकडेही लक्ष द्यायचे आहे.

जर आपण राजकारणाला पूर्णवेळ देणार असू तरच माणसाने राजकारणात जायला हवं. कारण त्यातील तुमची मत, तुमची काम यातून तुम्ही थेट लोकांपर्यंत पोहोचता. यामुळे लोकांना खूप मोठा फायदा किंवा नुकसान होऊ शकते. त्यामुळे त्यात पूर्णवेळ देणं गरजेचे आहे. त्यानंतरच माणूस त्यात अग्रसेर होत जातो”, असे अमृता फडणवीस म्हणाल्या.

दरम्यान अमृता फडणवीस यांनी गायलेलं ‘मूड बना लिया’ हे गाणं सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या गाण्याला नेटकरी विविध प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. काहीजण त्यांचं कौतुक करत आहेत तर काहींनी त्यांना ट्रोल केलं आहे. यापूर्वीही त्यांची काही गाणी प्रदर्शित झाली होती. ‘मूड बना लिया’प्रमाणेच ती गाणी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 13-01-2023 at 09:43 IST

संबंधित बातम्या