छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘देवमाणूस’ने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. या मालिकेचा शेवटचा दोन तासांचा विशेष एपिसोड १५ ऑगस्ट रोजी प्रसारित झाला. या मालिकेचं कथानक तसंच त्यातील व्यक्तिरेखा या सगळ्यावरच प्रेक्षकांनी प्रेमाचा वर्षाव केला. डॉ. अजितकुमार देव उर्फ देवीसिंग याची भूमिका अभिनेता किरण गायकवाडने साकारली असून या भूमिकेला त्याने योग्य न्याय देत प्रेक्षकांची मोठी पसंती मिळवली आहे.
मालिका संपल्यानंतर देवसिंग म्हणजेत अभिनेता किरण गायकवाडने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही खास फोटो शेअर केले आहेत. याचसोबत किरणने प्रेक्षकांसह टीमचे आभार मानत एक खास पोस्ट शेअर केलीय. या पोस्टमध्ये त्याने लिहिलं, “देवमाणूस सीरियल बघता बघता संपली …..खरतर कुठलाही प्रोजेक्ट तेव्हाच चांगला होतो जेव्हा सगळे जीव तोडुन काम करत असतात माझे सहकलाकार , सर्व तंत्रज्ञ, प्रॉडक्शन टीम, हेअर आणि मेकअप डिपार्टमेंट ते स्पॉट दादां पर्यंत साऱ्यांनी हातभार लावला ….देवमाणुस च्या सेटवरचा प्रतेक माणुस जीव तोडून काम करत होता त्याबदल वादच नाही ; कारण रात्री साडे दहा वाजता परदर्शित होणाऱ्या आजवरचया मालीकांचे टीआरपी रेकॉर्डस देवमाणसू ने मोडले. टीआरपीचे रेकॉर्डस नक्कीच आनंद देतात पण त्यापेक्षाही घराघरातले छोटे नी मोठे रात्री जागनू न चुकता देवमाणुस बघु लागले. “या डॉक्टरला लई हानला पाहेन”, “हयों कसला डॉक्टर शैतान हाय ह्यो” ,”हा डॉक्टर ह्यच्यात *****(अपशब्द)”, “खुप सारे मीम्स तयार झाले मीम्सला पण सलाम यार “आणि मी म्हणतो हीच खरी माझ्या कमाची पावती.” असं म्हणत किरणने टीमसह प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.
हे देखील वाचा: ‘पारंपरिक परकर पोलक्याला मॉर्डन टच, ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील संजनाचा हटके लूक
View this post on Instagram
पुढे तो म्हणाला, “हा प्रवास खरंच सोपा नव्हता. इतक्या गंभीर विषयाला अत्यंत सोप्या आणि मनोरंजक पद्धतीने प्रेक्षकांसमोर मांडताना मनात साशंकता नक्कीच होती..पण जशी कागदावर गोष्ट आणण पात्र आकार घेऊ लागली तशा या शंका मनातुन दूर झाल्या. खुप सारे प्रेक्षक असतील ज्यांना माझं काम नाही आवडलं तुम्हाला पण धन्यावाद … मी अजुन प्रयत्न करत राहिन…लवकरच काहीतरी भन्नाट घेऊन येइनच …” असं म्हणत किरणने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.
दरम्यान या मालिकेचा शेवट पाहता मालिकेचा दुसरा भाग येणार अशी उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात निर्माण झालीय.